Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

नवी मुंबईचे शिल्पकार,माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर…

   नवी मुंबई (प्रतिनिधी )देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवी मुंबईचे शिल्पकार तसेच कोरोना काळात नवी मुंबईकरांसाठी पालकाची भूमिका निभवणारे माजी ठाणे जिल्हा पालक मंत्री तथा आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरखैरणे सेक्टर 8 रा फ नाईक महाविद्यालयामध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री गणेश नाईक ब्लड डोनर चैन या संस्थे मार्फत ब्लड कॅम्प ठेवण्यात आले होते याचे उद्घाटन माजी महापौर- जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले

यावेळी उपस्थित माजी खासदार संजीव, नाईक माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनवणे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत त्याचबरोबर सुरज पाटील सतीश निकम इत्यादी मान्यवर व भाजप कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये ब्लड कॅम्प उदघाटन पार पडले यावेळी गणेश नाईक ब्लड डोनर चैन चे सर्व पदाधिकारी यांनी “नाते रक्ताचे “असे ब्रीद वाक्य करत १००० हजार ब्लड बॅग करण्याचा संकल्प ठेवला आहे, यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की गणेश नाईक हे आमचे फक्त मार्गदर्शकच नाही तर आमचे पालक , कुटुंब प्रमुख आहे ज्या ज्या वेळी नवी मुंबई कारांवर संकट येते त्या त्या वेळी नवी मुंबई करांच्या पाठीशी एक कुटुंब प्रमुख म्हणून दादा आमच्या पाठीशी उभे राहतात ज्या वेळी कोरोनाचे संकट आले सर्व जगामध्ये भयानक परिस्थिती होती पण गणेश नाईक यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नवी मुंबईच्या जनतेला कोरोनाच्या संकटातून कसे वाचविता येईल त्या साठी अहोरात्र प्रयन्त केले अनेक नेते घरी बसून राहिले कोण्ही आपल्या गावी गेले तर काही नेते फक्त डिजिटल माध्यमातून लोकांना संदेश देत होते पण गणेश नाईक यांनी स्वता जनते मध्ये जाऊन त्यांच्या समाश्या सोडविण्याचे काम कोरोना काळातही केले असा नेता आम्ही सम्पूर्ण महाराष्ट्रात कुठेही पाहिला नाही त्यांच्या बरोबर माजी खासदार संजीव नाईक ,माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक आणि त्यांच्या समवेत असलेले सर्व त्यांचे शिलेदार कोरोना काळात नवी मुंबई करांसाठी जनतेमध्ये जाऊन काम करत होते


गणेश नाईक असे व्यक्तिमहत्व आहे की अनेक धर्माचे व समाज्याचे लोक त्यांच्या कडे जातात पण कधी जात धर्म न पाहता फक्त माणुसकी हा एकच धर्म त्यांचे ब्रीद वाक्य आहे
आशा या महान लोकनेत्यास आम्हा नवी मुंबई तील कार्यकर्त्यांचा मानाचा मुजरा

 

Related posts

*नवी मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यसुविधेवर प्रश्नचिन्ह; सामाजिक संघटनांची तीव्र प्रतिक्रिया*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या 16 व्या अधिवेशनाचे निमंत्रण मंत्री महोदय यांना देताना संपर्क प्रमुख नितीन जाधव

jantechasavdhanmaharashtra

गहाळ झालेला मोबाईल 24 तासाच्या आत शोधून देण्यास कोपरखैरणे पोलिसांना यश

Leave a Comment