Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*गृहनिर्माण संस्थांवरील झाड छाटणी शुल्क रद्द करा; नगरसेवक सुनील कुरकुटे यांची आयुक्तांकडे ठाम मागणी*

*गृहनिर्माण संस्थांवरील झाड छाटणी शुल्क रद्द करा; नगरसेवक सुनील कुरकुटे यांची आयुक्तांकडे ठाम मागणी*

प्रतिनिधी :– जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये झाडांच्या छाटणीसाठी आकारण्यात येणारे प्रति झाड २०० रुपये एनओसी शुल्क तात्काळ रद्द करून नागरिकांना मोफत झाड छाटणी सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम आणि समाजहिताची मागणी प्रभाग क्रमांक १९ सानपाडा येथील नगरसेवक सुनील रामदास कुरकुटे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी ई-मेल तसेच प्रत्यक्ष लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. अनेक वेळा फांद्या तुटून पडणे, वीज वाहिन्यांचे नुकसान होणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे तसेच नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याच्या घटना घडत असताना महानगरपालिकेकडून एनओसी शुल्काच्या नावाखाली आर्थिक भार टाकला जात असल्याबद्दल नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महानगरपालिकेमार्फत प्रति झाड २०० रुपये शुल्क आकारले जात असताना प्रत्यक्ष झाड छाटणीचा खर्च गृहनिर्माण संस्थांनाच करावा लागत असल्याने ही सामान्य नागरिकांची अप्रत्यक्ष आर्थिक लूट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिक नियमितपणे प्रॉपर्टी टॅक्स आणि विविध कर भरत असताना सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित मूलभूत सेवांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणे अन्यायकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी प्रशासनाकडे झाड छाटणी शुल्क तात्काळ रद्द करणे, महानगरपालिकेमार्फत मोफत झाड छाटणी सेवा सुरू करणे, पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांची तपासणी व छाटणी मोहीम राबविणे तसेच नागरिकांसाठी सुलभ हेल्पलाईन व तक्रार नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

समाजहिताच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नगरसेवक सुनील कुरकुटे हे सानपाडा परिसरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि सार्वजनिक सुरक्षेच्या प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे झाड छाटणी शुल्क रद्द करण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही सामान्य नागरिकांना दिलासा देणारी आणि समाजहित जपणारी असल्याचे बोलले जात आहे.

“नागरिकांची सुरक्षा ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून झाड छाटणीसारख्या अत्यावश्यक सेवांवर आर्थिक बोजा टाकण्याऐवजी महानगरपालिकेने नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा,” असे मत नगरसेवक सुनील कुरकुटे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून समाजहितासाठी केलेल्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related posts

अष्टविनायक मित्रमंडळ कोपरखैरणे यांनी गणरायांची जयमल्हार ची प्रतिमा स्थापन केली

jantechasavdhanmaharashtra

‘*आम्ही शासक नाही, आम्ही शिवछत्रपतींचे मावळे व सेवक’! मुख्यमंत्री- देवेंद्र फडणवीस*

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या उत्तम कामगिरीबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment