Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रशहर

पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर शक्यता ? मोदी सरकार दोन दिवसात मोठा ‘धमाका’ करण्याच्या तयारीत

देशातील पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय 17 सप्टेंबरच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

नवी दिल्ली : एकीकडे खाद्यतेल आणि डाळींच्या वाढत्या किंमती तर दुसरीकडे शंभरीपार गेलेले इंधनाचे दर, यामध्ये सामान्य माणसाची अवस्था केविलवाणी होत असताना एक आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. मोदी सरकार येत्या 17 तारखेलापेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. असं जर झालं तर देशातील पेट्रोलचे दर हे अर्ध्याने कमी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली 17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची  बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला जाईल असं अर्थमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. असं जर झालं तर पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागून त्याच्या किंमती थेट अर्ध्यावर येण्याची शक्यता आहे.

Related posts

शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई महापालिका कोपरखैरणे अतिक्रमण विभागा तर्फे कारवाईचा धडाका

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग आयोजित आर .एस. पी .अधिकारी युनिट यांच्या सौजन्याने सफाई कर्मचारी व पत्रकारांना रेशन कीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन! समाजसेवकांचा ग्लोबल पीस भारत सेवा रत्न सुवर्ण पदक पुरस्कार देऊन होणार सन्मान ….

Leave a Comment