Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

चालू ट्रेन मधून मोबाईल चोरून पसार होणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी केली अटक

                      नवी मुंबई (कासिम अली सैय्यद)

वाशी:- चालत्या ट्रेन मधून चोरीच्या अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना गोवंडी रेल्वे स्थानकावर घडली आहे. रेल्वे स्थानकावर थांबून सुरू झालेल्या रेल्वे मधून चोराने हा डाव साधला असून पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे.

दि. ८ सप्टेंबर रोजी जिनी बाबू वय १९ राहणार सेक्टर २६ वाशी या शिवडी ते वाशी असा लोकलच्या महिला जनरल डब्यातून प्रवास करत असताना सदर ट्रेन सुमारे ६ च्या दरम्यान गोवंडी रेल्वे स्टेशनवर प्रवासी चढ उतार करून पुन्हा सुरु झाली असता एका इसमाने हातातला मोबाईल खेचून चालू ट्रेन सोडून प्लॅटफॉर्म वरती उडी मारुन पळून गेला होता. याबाबत वाशी रेल्वे पोलीसात गुन्हा क्रं ११८/२१ कलम ३९२ भादवी अन्वये दाखल करण्यात आला.

सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर गुन्ह्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून तसेच खास बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी मोहम्मद आसिफ आलम अन्सारी, वय २२, राहणार बैगनवाडी, गोवंडी याला राहत्या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे. आरोपीने आणखी कुठे कोणते गुन्हे केले आहेत का या बाबतचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांची टीम करत आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठांच्या तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांच्या मार्गदर्शनानुसार सहायक पोलीस निरीक्षक लाड, महिला पोलीस नाईक शिंदे, पोलीस शिपाई दराडे, हांडे, मनवर, धायतडक, शिंदे, फुंदे, मैदाड यांनी केली आहे.

Related posts

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

*सीसीटीव्हीच्या आधारे नेरूळ पोलिसांनी 30 लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला केली अटक*

म रा मराठी पत्रकार संघ नवीमुंबईची कार्यकारणी जाहीर

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment