नवी मुंबई, (प्रतिनिधी) ऐरोली सेक्टर तीन येथील नवी मुंबई पालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. ऐरोली, दिघा, रवाळे नोड, गाव गावठाण, झोपडपट्टी परिसरातील सर्वसामान्यांना यापुढे फायदा होणार आहे. या ऑक्सिजन प्लांटसाठी गणेश नाईक यांनी एक कोटी आमदार निधी दिला होता.
राजमाता जिजाऊ रुग्णालय आता ऑक्सिजन पुरवठ्यात स्वयंपूर्ण बनले आहे. केवळ कोविड काळातच नव्हे तर कायम ऑक्सिजन पुरवठ्याची सुविधा नवी मुंबईकरांना उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवी मुंबईत ऑक्सिजनची कमतरता भासली होती. त्यावेळी पालिकेला खासगी कंपन्यांवर
अवलंबून राहावे लागले होते. पीएसए तंत्रज्ञानावर आधारित १००० एलपीएम क्षमतेचा हा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.
कोरोना नियमांचे पालन करीत
आमदार संदीप नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी सभापती अनंत सुतार, माजी सभागृहनेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी परिवहन समिती सभापती अॅड. जब्बार खान, पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबईत ३० ते ४० वर रोडावलेली कोरोनाची आकडेवारी आज दररोज सरासरी दोन हजारांपर्यंत गेली आहे. राज्यातही कोरोनाची दररोजची संख्या ३० ते ४० हजारांच्या घरात आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजनची मागणी वाढली तर जिजाऊ रुग्णालयातील या प्रकल्पामधून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करता येणार आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांनाही या प्रकल्पातून ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. कोरोनाविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. महापालिका आयुक्त आणि अनेक अधिकारी प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहेत. मात्र, काही अधिकाऱ्यांमध्ये सुधार घडविण्याची गरज आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
तंत्रज्ञान पीएसए
2 क्षमता 1000 एलपीएम
3 प्रतिदिन १.८६ टन ऑक्सिजनची निर्मिती
4 स्वतंत्र ५०० केव्हीए क्षमतेच्या जनरेटरची व्यवस्था
5 एकूण खर्च १ कोटी ३४ लाख ९७ हजार ३४४ रुपये
6 ऑक्सिजन पुरवठा दरांपेक्षा कमी दरात ऑक्सिजननिर्मिती
प्रतिदिन २०५ रुग्णांना फायदा
दररोज २०० जम्बो सिलिंडर भरता येतील एवढी ऑक्सिजननिर्मिती या प्लांटमधून होणार असून, प्रतिदिन २०५ रुग्णांना वैद्यकीय प्राणवायू पुरविता येणार आहे. राजमाता जिजाऊ रुग्णालयात २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. या अतिदक्षता विभागातील रुग्णांना या प्लांटमधून ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. ऐरोली, • रबाळे, दिघा आणि परिसरातील सर्वसामान्यांची वैद्यकीय ऑक्सिजनसाठी होणारी धावाधाव थांबणार आहे.
– आमदार-गणेश नाईक,

