स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र आणि राज्य स्तरावर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचा उजागर व्हावा या उद्देशाने सकारात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने घरोघरी तिरंगा या मोहिमेचा एक धागा म्हणून ७५ संपादकांना विनामुल्य राष्ट्रध्वज तिरंगाचे वाटप तसेच स्वातंत्र्य दिनावर . या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले .याच धर्तीवर
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके यांच्या नेतृत्वाखाली
नवी मुंबई मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक तिरंगा हा राष्ट्रध्वज नवी मुंबई मधील रिक्षा चालकांना सन्मानाने 75 वर्षपूर्ती म्हणून 75 तिरंगा ध्वज देण्यात आले यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी प्रशांत शिंदे व धनराज शिंदे , नवी मुंबई मोटार र्ट्रेनिंग स्कुल संघटनाचे अध्यक्ष मधुकर पाटील व सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र क्राईम न्यूज चे उपसंपादक -वामन चव्हाण , उधोजक -विक्रम शिंदे, पत्रकार व स्थानिक रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक व शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटील, विद्यालयाचे विध्यार्थी मुख्यध्यापक शेळके सर व शिक्षक ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मा . अध्यक्ष कुंडलिक कानगुडे सल्लागार सुनील गुंजाळ , अध्यक्ष -दशरथ चव्हाण , सचिव-प्रवीण हांडे, दिनकर गायकर ,मा सचिव -अशोक लांडगे ,प्रमोद माने, अशोक काळे, संतोष म्हात्रे, दिलीप म्हात्रे खंडू घुले सोनावणे , कदम, राजुभाई, सर्वांच्या उपस्थिती व सहकार्याने कार्यक्रम पार पडला

