Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनची ठाण्यात मोठी कार्यवाही

                           अरुण बिराजदार

ठाणे प्रतिनिधी:- मागच्या काही दिवसांपूर्वी ठाणे गुन्हे शाखा घटक -१ यांना माहिती मिळाली त्यामहिती आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पाटील व त्यांचे सहकारी सगळे त्या आरोपी च्या शोधात निघाले असताना त्यांना ४-५ इसम एका कार मध्ये दरोडा टाकण्यासाठी निघत होते वेळीच सावध राहून या सर्व पोलीस अधिकारी यांनी सर्व आरोपींना जागीच ताब्यात घेऊन पुढची कार्यवाही करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेहण्यात आले.

सदर माहितीच्या आधारे केले कारवाईत आरोपी नामे १) लाला उर्फ शिवपूजन रामकुमार आगारी , वय २२ वर्ष , रा . ग्राम महातनीया, पो , वासा दर्गा ,तहसील डुमरियागंज , जि सिध्दार्थनगर , उत्तरप्रदेश ,२) गुड्डू उर्फ मोहम्मद अजमल मोहम्मद हसन खान , वय २५ वर्ष , रा, ठी – ग्राम भगवानपूर टोला बालकज्योत , तहसील नवगड, जि , सिद्धार्थ नगर , उत्तरप्रदेश ३) सत्तू उर्फ लक्ष्मण श्रीकृष्ण सहानी , वय २२ वर्ष ,रा ठी -ग्राम करीदा ,तहसील नवगढ , पोलीस स्टेशन मूहांनी, जि , सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश , ४) राकेश सिपही यादव , वय २६ वर्ष , रा . ठी – ग्राम मझुवा , तहसील , नवगड, जि . सिद्धार्थनगर , उत्तरप्रदेश . ५) शहजाद अब्बास खान , वय २१ वर्ष , रा. ठी – अ . क्र ४ प्रमाणे यांना दरोड्याचे तयारीत असताना घटक हत्यारे , साहित्य , वस्तू व कार असा एकूण २,३५,३००/- रु . किमतीचा मुद्देमालासह अटक करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २० / २०२३ भारतीय दंड संहिता कलम ३९९, ४०२ सह शस्त्र नियम १९६२ चे कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम


३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . नमूद गुन्ह्याचा तपस गुन्हे शाखा घटक १, ठाणे मार्फत सुरु आहे . नमूद आरोपी यांची दिनांक १६/०१/२०२३ रोजीपावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे .

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पाटील,पोलीस निरीक्षक श्री कृष्णा कोकणी ,स पो नि निलेश मोरे, संदीप चव्हाण,योगेश काकड,पोलीस हवालदार दीपक जाधव,पाटील नंदकुमार, अनिल ,राजेंद्र सांबरे व सर्व सहकारी यांच्या कडून करण्यात आली आहे.

Related posts

पत्रकारांना केव्हाही कधीही अडचण भासल्यास फक्त आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू – यशवंत सोरे

*A.P.M.C. अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षा रक्षक व अधिकाऱ्यावर परप्रांतीयांचा हल्ला; दोषींवर कठोर कारवाईची मागणी*

जांभळे गावच्या दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू.

Leave a Comment