एफ.जी.नाईक महाविद्यालयात मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित महारक्तदान शिबिर संपन्न
कोपरखैरणे प्रतिनिधी:- रा .फ.नाईक विद्यालय व एफ जी नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार सन्माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय श्री गणेशजी नाईक साहेब ब्लड डोनर चेन व नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून 3 ऑगस्ट 2023 रोजी महारक्तदान शिबिराचे व लायन्स क्लब तुर्भे यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत नेत्र चिकित्सा आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच मधुमेह तपासणी शिबिर यांचे आयोजन करण्यात आले.

सदर शिबिराचे उद्घाटन श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार सन्माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
ह्या कार्यक्रम प्रसंगी शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देविदास म्हात्रे, माजी नगरसेवक श्री केशव म्हात्रे (अंकल) , श्री लीलाधर नाईक , श्री चंद्रकांत पाटील माजी नगरसेविका सौ सायली शिंदे, सौ भारती ताई पाटील, सौ वैशाली नाईक म्हात्रे, सौ लताताई मढवी समाजसेवक श्री विनायक नाईक, श्री शरद पाटील , श्री शिवराज मढवी श्री हनुमंत दळवी, श्री अविनाश वासुदेवन, श्री रविकांत पाटील, श्री तुळशीराम म्हात्रे, श्री विनोद म्हात्रे, श्री भालचंद्र मढवी, श्री किशोर पाटील, श्री संदीप म्हात्रे, श्री.आत्माराम पाटील, श्री दाजी सणस, श्री शिरीष पाटील, श्री दिनेश पारेख, श्री हिरामण राठोड श्री अंशू वर्धन, श्री भजनदास खैरे, श्री शंकर मोरे, श्री हनुमंत दळवी, श्री रॉबिन मढवी, लायन्स क्लब इंटरनॅशनल चे श्री एन. आर. परमेश्वरम , श्री अनुप थाडवाणी , श्री महेश सावंत , श्री उमंग देसाई , त्याचबरोबर नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर येथील डॉक्टर श्रद्धा मॅडम, श्री विक्रम खोपकर, डॉ.अक्षय धोत्रे व इतर स्टाफ, तसेच कच्छी युवा संघाचे चंद्रकांत दाढीया, पदाधिकारी व कार्यकर्ते जैन समाज JITO चे पदाधिकारी व कार्यकर्ते , इतर विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, श्रमिक शिक्षण मंडळ प्रशासकीयय अधिकारी श्री.नरेंद्र म्हात्रे , श्रमिक शिक्षण मंडळाचे क्रीडा व्यवस्थापक श्री सुधीर थळे सर, एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रताप महाडिक , रा. फ. नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पाटील, सौ राजश्री यादव मॅडम ,सौ सुमती सुपैय्या मॅडम, सौ सीमा म्हात्रे मॅडम, सौ चारुशीला चौधरी मॅडम, सौ गौरी पवार मॅडम , सर्व प्राध्यापक , शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी,
पालक व हितचिंतक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. प्रताप महाडिक सर यांनी श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री. संदीपजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजवर महाविद्यालयाने संपन्न केलेल्या विविध समाज उपयुक्त उपक्रम जसे की सातत्याने घेत असलेले रक्तदान शिबिर ,मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर, मोफत पॅन कार्ड व मोटर वाहन परवाना वाटप, नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप, स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती इत्यादी उपक्रमांची माहिती देत महाविद्यालयाची कौतुकास्पद कामगिरी विशद केली. त्याचबरोबर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मागील वर्षी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व नवी मुंबईतील महाविद्यालयांपैकी मुंबई विद्यापीठाचे प्रथम पारितोषिक एफ.जी.नाईक महाविद्यालयाने पटकावले आहे याचा विशेष उल्लेख केला तसेच मागील पंधरा दिवसापासून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी जे नवी मुंबईत विविध ठिकाणी आपल्या पथनाट्यद्वारे रक्तदाना संदर्भात जनजागृती करत होते त्यांचंही त्यांनी आपल्या भाषणामध्ये कौतुक केले व नवी मुंबईतील तळागाळातील लोकांना गणेश नाईक ब्लड डोनर चेन यांच्या माध्यमातून तत्परतेने गरजेनुसार हवे ते रक्त उपलब्ध होते याबाबत समाधान व्यक्त केले.
श्रमिक शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री नरेंद्र म्हात्रे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी माननीय श्री संदीपजी नाईक साहेब यांचा श्रमिक शिक्षण मंडळाचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून उल्लेख करत शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कारकीर्दीचा आढावा घेत, त्यांना भावी सामाजिक व राजकीय कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार सन्माननीय श्री संदीपजी साहेब यांनी आपल्या भाषणात श्रमिक शिक्षण मंडळाचे संस्थापक लोकनेते आदरणीय श्री गणेशजी नाईक साहेब यांची श्रमिक शिक्षण मंडळाच्या स्थापनेमागील पार्श्वभूमी स्पष्ट करत असताना, नवी मुंबईतील कष्टकरी समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जेचे शिक्षण उपलब्ध व्हावे या विशिष्ट शैक्षणिक धोरणाच्या उद्देशाने श्रमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली असे सांगितले व आज माननीय श्री.गणेशजी नाईक साहेब यांच्या या शैक्षणिक धोरणामुळे नवी मुंबईतील विद्यार्थी समाजात विविध क्षेत्रात मोठ मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत याचे समाधान व अभिमान व्यक्त केला. तसेच माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या या शैक्षणिक धोरणास पाठबळ देणारे व श्रमिक शिक्षण संस्थेच्या वाढीस अथक परिश्रम घेऊन खत पाणी देणाऱ्या सर्व आजी व माजी पदाधिकाऱ्यांचे, मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या भाषणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जागतिक योग दिवसाचा जो प्रचार-प्रसार करण्यासाठी विशेष करून शाळांमध्ये व महाविद्यालयांमध्ये उपक्रम सुरू केले आहेत त्याबद्दल कौतुक करत, या रा.फ. नाईक विद्यालयातील योग दिवसात सहभागी झालेल्या विकलंग विद्यार्थी कु.साईराज जाधवचे त्याच्या सकारात्मक वृत्तीचे विशेष कौतुक केले व त्याला आपल्या वाढदिवसानिमित्त श्रमिक शिक्षण मंडळातर्फे या विद्यार्थ्यांची पुढील वाटचाल सुकर व्हावी यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या पसंतीची विशेष विकलांगांसाठीची स्कूटर भेट दिली. तसेच सर्व गुण संपन्न व भारत सरकारचे विविध पुरस्कार पटकावणारी नवी मुंबई ही या स्थानावर पोचली याचे श्रेय जेवढे माननीय श्री गणेशजी नाईक साहेबांचे आहे, तेवढेच विविध स्वयंसेवी संस्थांचे आहे हे सांगत त्यांनी लायन्स क्लब या संस्थेचा वाटा मोठा आहे हे नमूद केले. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरात उपस्थित विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे त्यांच्या नवी मुंबईतील राबवल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमाबद्दल गुणगौरव केला व संस्थेतील सर्व प्रशासकीय मंडळाचे ,शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, विद्यालयातील व महाविद्यालयातील एन.सी.सी व एन.एस.एस या युनिटचे सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेत यशस्वीरित्या संपन्न केले व आपली सामाजिक बांधिलकी जपली याबद्दल सर्वांचे विशेष आभार मानले.
या शिबिराच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील सदृढ व सुजान नागरिकांना तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रक्तदानाचे विनम्र आवाहन करण्यात आले. या आवाहला मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदाते नागरिक व विद्यार्थ्यांनी 288 रक्त पिशव्यांचे रक्तदान केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्रा जयश्री दहाट व डॉ दत्तात्रय घोडके यांनी केले.

