Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे प्रतिनिधी :-    शिवाजी  राठोड

*घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

मुंबई, दि. २६:- ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे, भागवत धर्माचे वैश्विक राजदूत, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य श्री बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, बाबा महाराजांची रसाळ वाणी, निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती. त्यांनी कीर्तन- निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

00000

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (वय ८९) यांचे निधन. झालं. सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला सयांकाळी ५ वाजता नेरुळ (नवी मुंबई )येथे अंत्यसंस्कार होणार.

Related posts

*ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर देतात का कचऱ्यातून विष ??..नागरिकांचा सवाल*

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

*नक्षलग्रस्त भागातील विशेष कामगिरीबद्दल नवी मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांना ‘विशेष सेवा पदक’*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment