Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

ईश्वर नगर ते गणपती पाडा येथील भुयारी मार्गाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण*

*ईश्वर नगर ते गणपती पाडा येथील भुयारी मार्गाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते लोकार्पण*

नवी मुंबई :-प्रतिनिधी – खासदार राजन विचारे यांच्या मतदार संघातील त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने केलेल्या कामांचा लोकार्पण व पाहणी दौरा आज नवी मुंबई येथे संपन्न झाला. त्यामध्ये ऐरोली कळवा एलिव्हेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाची पाहणी करतेवेळी ईश्वर नगर परिसरातील नागरिकांनी रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात कमी करण्यासाठी भुयारी मार्गाची निर्मितीची मागणी केली होती. आज या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, शहर प्रमुख प्रवीण म्हात्रे, महेश कोटीवाले, माजी नगरसेवक एम के मढवी, करण मढवी, विजयनंद माने, रवींद्र म्हात्रे, किशोर गायकर, जगदीश गवते, विभाग प्रमुख विनायक पवार, उपशाखा प्रमुख सुरेश पवार, शशिकांत पार्टे, कळवा विभागातील शहरप्रमुख चंद्रकांत विधाटे, उपशहर प्रमुख मुकुंद ठाकूर, शाखाप्रमुख राजकिरण तळेकर, दिनेश ठाकूर, जगदिश पाटील, चंद्रकांत मयेकर, अनिकेत कांबळे तसेच शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

*ऐरोली – कटाई मार्गाची पाहणी* – नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकसित होत असल्याने शेजारी होणाऱ्या अंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भविष्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करून खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने एम एम आर डी ए मार्फत ऐरोली कटाई हा नवीन मार्ग विकसित करण्यात येत आहे. हा रस्ता डोंगर भागातून भुयारी मार्ग काढून फक्त १५ मिनिटात ऐरोली ते कटाई गाठता येणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिकांना हा मार्ग सुखकर होणार आहे. आज खासदार राजन विचारे यांनी या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली.

*गवळीदेव* – घणसोली नोड येथील पर्यटकांना आकर्षित करणारे स्थान गवळीदेव हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे काम खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांने महानगरपालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. खासदार राजन विचारे यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पर्यटन व पर्यावरण मंत्री मा. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्याकडे केलेल्या मागणी नुसार पर्यटन विभागाने ५ कोटी निधी महानगरपालिकेस गवळीदेव परिसर विकसित करण्याकरिता देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नेचर ट्रायल (गवळीदेव स्थळापर्यंत जाणारा मार्ग) परिसर सुशोभीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालय व्यवस्था, निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी यांना पाहण्यासाठी बैठक व्यव्यस्था करणे, तसेच मुख्य प्रवेशद्वाराचे हि काम महापालिकेमार्फत पूर्ण करण्यात आली आहेत व उर्वरित कामाचा शुभारंभ करण्यात आला.

*ऐरोली – घणसोली उड्डाणपूल* – गेली १४ वर्ष सिडको ने अपूर्ण अवस्थेत ठेवलेल्या ऐरोली – घणसोली रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी सिडको व महापालिकेकडे पाठपुरावा करून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध केला आहे. त्याला यश आले आहे.
या एलिव्हेटेड उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी एकूण ५४० कोटी मंजूर आहेत. त्यापैकी नवी मुंबई महापालिका व सिडको यांच ५० टक्के अनुदान असणार आहे हा पूल ३.४७ किलोमीटरचा असून तो ऐरोली कटाई नाका या मार्गेकेलाला जोडण्यात येणार आहे. तसेच या पुलावरून पर्यटकांना फ्लेमिंगो बघण्यासाठी स्वतंत्र गॅलरी विकसित होणार आहे. आज या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या कामास आज सुरुवात होणार आहे या कामाची पाहणी केली.

*ऐरोली – जैवविविधता केंद्र* – नवी मुंबईतील फ्लेमिंगो या पक्षांना पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी ऐरोली येथे होत असल्याने खासदार राजन विचारे यांनी कांदळवन विभागाकडून सागरी जैवविविधता केंद्राच्या विकासासाठी ३० कोटीची मान्यता मिळवली असून त्यातील पहिल्या टप्प्यात १० कोटीचे काम या वर्षी सुरु होत आहे. त्यामध्ये जेट्टी ची व्यवस्था करून कांदळवन वाटिका उद्यान व म्युझियम उभारण्यात येणार हा संपूर्ण प्रकल्प ४००० स्क्वेअर मीटर जागेत होणार आहे साधारण कोलंबी माशासारखा आकार असणारी ही वास्तू असणार आहे.

मुख्य प्रवेशद्वार, तिकीट खिडकी, सेक्युरिटी रूम ,बुक स्टॉल, कांदळवन आर्टिफिशियल डिस्प्ले तसेच आर्टिफिशल स्नेक पॉड असणार आहे त्याचबरोबर समुद्राखालील प्रवाळ दाखवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ४८३ स्क्वेअर मीटर जागेवर कॅफेटेरिया विकसित होणार आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर कार्यशाळा, रिसर्च सेंटर, फीडिग सेंटर, परजातींसाठी विलगीकरण रूम असणार आहे. या सेंटरवर भेट देणाऱ्याला पाणबुडीत बसल्याचा अभास मिळणार आहे निसर्ग व पक्षी प्रेमी यांना पक्षांना बघण्यासाठी उंच मनोऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे लवकरच म्युझियमचे काम सुरू होत आहे. आज या कामाची सुरुवात करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.

*गोठवली मैदान* – रबाळे गोठवली गावात असलेला सेक्टर २४ प्लॉट नंबर १ वरील नवी मुंबई महापालिकेच्या खेळाचे मैदानसाठी आरक्षित असलेला ११९९९ चौरस मीटरचा भूखंड सिडको कडून सततचा पाठपुरावा करून नवी मुंबई महापालिकेला मिळवून दिला. यासाठी आपला २५ लाख खासदार निधी व नवी मुंबई महानगरपालिका २ कोटी 38 लाख निधी असा एकत्रित करून त्यांनी सुसज्ज असे क्रिकेटच पटांगण विकसित करून प्रेक्षक गॅलेरी, व्यायाम शाळा, खुला रंगमंच, संरक्षण भिंत, गार्डन, पार्किंग व्यवस्था, अशा अनेक कामाचा समावेश करून घेऊन या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला आहे.

*वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक* – सुशोभीकरणासाठी ७५ लाख खासदार निधी व नवी मुंबई महापालिका ४ कोटी ५७ लाख तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा, आर्च (बुरुज), उभे करून चौकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे.
वाशी रेल्वे पादचारी पूल – एम आर व्ही सी मार्फत ३ कोटी ७ लाख रुपये खर्च करून लांबी ९१ मीटर रुंदी ४ मीटर रेल्वेमार्फत पूल उभारण्यात आला. नागरिकांची गरज लक्षात घेऊन हे पूल काही वर्षापूर्वीच नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. या पुलाची पाहणी आज खासदार राजन विचारे यांच्याकडून करण्यात आली. जिने उतरतात त्या ठिकाणी परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

*इलेक्ट्रिक बसेस पाहणी* – केंद्र शासनाच्या फेम योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात फेम १ मध्ये ३० बसेस दुसऱ्या टप्प्यात फेम २ मध्ये १५० बसेस नवी मुंबई महानगर पालिकेला मिळवून दिल्या. त्याचे चार्जिंग स्टेशनची पाहणी करुन बसेस मधून प्रवास केला.

*सायकल ट्रॅक* – नवी मुंबई तील पाम बीच मार्गावर सायकल ट्रॅक ची निर्मिती करून शहराचा नावलौकिक वाढण्यास भर पडणार आहे. या मार्गावर सायकल ट्रॅक बनविल्यामुळे मुलांमध्ये सायकलिंग ची आवड निर्माण होईल. व विविध स्थरावर स्पर्धा करण्यासाठी मुले तयार होऊ शकतील. तसेच सायकलिंगमुळे नागरिकांचे स्वास्थ्य निरोगी राहण्यास मदत होणार असल्याने या प्रकल्पास खासदार राजन विचारे यांनी खाडी किनारी लागणाऱ्या सर्व परवानग्या वन विभागाकडे पाठपुरावा करून मिळवून दिल्या आहेत. आज नवी मुंबई महानगरपालिकेने याचे काम सुरु केले आज या कामाची पाहणी केली.

Related posts

जादुगार पी.बी.हांडे याची “मँजिक बुक आँफ रेकाँर्ड” मध्ये नोंद*

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर*

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment