नवी मुंबई (प्रतिनिधी)
आकस्मिक वादळामुळे व पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उद्भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दि. १४ मे रोजी तातडीने दूरदृश्य प्रणालीव्दारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली तसेच कालचा प्रसंग लक्षात घेऊन आपत्ती सांगून येत नाही त्यामुळे 24×7 सतर्क राहण्याचे निर्देश दिले.या अनुषंगाने 13 तारखेला घडलेल्या घटनेनंतर वाशी विभाग सहा. आयुक्त सागर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी गाव येथे कृष्णा फॅमिली रेस्टॉरंट आणि बार जवळ विनापरवानगी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर निष्काशनाची कारवाई…करण्यात आली व अशा विना परवाना असणाऱ्या सर्व होर्डिंगवर कडक कारवाई करणार
त्यांनी पुढे बोलताना सांगितले की कोण्हीही विना परवाना होर्डिंग लावू नये अन्यथा आशा प्रकारे कडक कारवाई होईल

कारवाई नंतर स्थानिक नागरिकांनी वाशी विभागीय अधिकारी सागर मोरे यांचे कौतुक करत मानले आभार

