Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

टेंपो आणि कारची धडक. *अपघातात चार जण जखमी!. वाहनांचे मोठे नुकसान


*टेंपो आणि कारची धडक.
*अपघातात चार जण जखमी.
*वहाणांचे मोठे नुकसान.

जुन्नर – प्रतिनिधी :- कैलास बोडके

नगर कल्याण महामार्गावरील
कोळवाडी (ता. जुन्नर ) गावच्या हद्दीत ओतूर कडून कल्याण दिशेने जाणारी कार क्र.( एम एच १६ए टी ९४२६) व कल्याण कडून ओतूरच्या दिशेने जाणारा टेंपो क्र( एम एच १४एच जी ४९९१) या दोन वहानांची समोरासमोर धडक होऊन चारजण जखमी झाल्याचे वृत्त हाती आले आहे.
सदर अपघातात सचिन भानुदास बेरड (वय ३४) ,आश्विनी सचिन बेरड (वय ३० ),त्रिशा सचिन बेरड (वय ०३) सर्व रा. नेहरूनगर,भिंगार ,जिल्हा अहमदनगर तर
टेंपोचालक विजय सुरेश नाडेकर( वय २६ ) रा. तळेरान. ता. जुन्नर. जि. पुणे हे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामसुंदर जायभाये हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले व जखमींना आवश्यक ती मदत करीत त्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान धडक झालेल्या दोन्ही वहानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धडके नंतर टेंपो जागेवरच पलटी झालेला आहे.

Related posts

*स्व.ह.भप.बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! मुख्यमंत्री यांचे प्रशासनाला सूचना*

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

*१५ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या दोघांना दीड तासात कोपरखैरणे पोलीसांनी केली अटक; पीडित मुलाची सुखरूप सुटका*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment