Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

गृहनिर्माण सोसायटीचे नियम वेशीवर टांगून तीन आपत्य असलेल्या सभासदांनी लढवली भिमरत्न सोसायटीची निवडणूक.*

*गृहनिर्माण सोसायटीचे नियम वेशीवर टांगून तीन आपत्य असलेल्या सभासदांनी लढवली भिमरत्न सोसायटीची निवडणूक.*

मुंबई (प्रतिनिधी) : तीन आपत्य असलेल्या सदस्याला गृहनिर्माण सोसायटी निवडणूक यापुढे लढवता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला असला, तरीही काही सभासद कायद्याला न जुमानता निवडणूक लडवत असल्याचा गैरप्रकार गोवंडी स्थित भिमरत्न (एस.आर.ए.) सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणुकीत घडला आहे. संस्थेचे सभासद व समाज सेविका सौ.शोभाताई कांबळे यांनी या गैरप्रकाराची तक्रार निवडणूक अधिकारी श्रीमती. देवयानी दळवी यांना तसेच एस.आर.ए. येथील सहनिबंधक यांना दिली. श्रीमती दळवी आणि सहनिबंधक यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अपात्र उमेदवार सौ. वर्षा बाबाजी मुरादे, सौ. खान रेहाना खातून मोहमद इक्बाल आणि श्री.खान जमाल अहमद राहतअली यांना निवडणूक लढवता आली. निवडून आलेले उमेदवार श्री.मधुकर माने, श्री.बबन गायकवाड, श्री.वसंत कामेरकर, श्री.मनोज कामेरकर इत्यादी यांना निवडणुकीतील गैरप्रकार समजताच त्यांनी संस्थेच्या फेर निवडणूकिची मागणी केली आहे. अपात्र उमेदवार सौ. वर्षा बाबाजी मुरादे यांचे पती श्री.बाबाजी मुरादे आणि निवडणूक अधिकारी श्रीमती देवयानी दळवी आणि त्यांचे सहकारी श्री.पाटील यांनी संगनमताने निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची करण्याची मागणी देखील निवडून आलेले उमेदवारांनी व सदस्यांनी सहनिबंधक यांच्याकडे केली आहे. निवडणुकीत गैरप्रकार करून शासनाची व सभासदांची फसवणूक करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा लोकहितार्थ प्रयत्न जस्टीशिया अंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना (एन.जी.ओ.) च्या वतीने ॲड.सागर कांबळे करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Related posts

सानपाडा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा

jantechasavdhanmaharashtra

कर्णकर्कश्श आवाज़ करणाऱ्या दुचाकी वाहनांवर ‘ कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

jantechasavdhanmaharashtra

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

Leave a Comment