यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?
नवी मुंबई :- प्रतिनिधी
महाराष्ट्र मध्ये सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था पैकी, यशोमंदिर सहकारी पतसंस्था ओळखली जाते. या संस्थेची जमेची बाजू म्हणजे, या संस्थेला सभासद कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे .संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही सामाजिक कार्य असो किंवा संस्थेच्या हितासाठी असो, सर्वात जास्त प्रमाणात संस्थेचे हितचिंतक सभासद अग्रेसिव असतात, या संस्थेमधील अनेक दिवंगत संचालकांचे नाव आजही अनेक कार्यकर्ते व सभासद व संचालक नेहमी केलेल्या कार्याचे कौतुक करत असतात. आणि दर पाच वर्षाला संस्थेची निवडणूक आली की अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन संस्थेच्या हितासाठी निवडणूक न होण्यासाठी प्रयत्न करत असतात, पण कुठेतरी काही कारणास्तव ही निवडणूक होतेच, याही पंचवार्षीसाठी अनेक सभासद कार्यकर्त्यांनी बिनविरोध निवडणूक होण्यासाठी प्रयत्न केले, पण ते शक्य झालं नाही, आणि शेवटी पुन्हा निवडणूक जाहीर झाली, अनेक सभासद कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले व काही कार्यकर्त येत्या ४ ते ५ दिवसात आपला अर्ज माघारही घेणार असल्याचे , सूत्रांच्या माहितीनुसार समजले ,पण यावेळेस चुरशीची लढाई होणार असे चित्र दिसून येत आहेत, अनेक वर्षांपासून यशोमंदिर पतसंस्थेमध्ये कै. एस जी हुलवळे व एम एस गायकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात असे, व तोच पॅनल प्रत्येक वर्षी भरघोस मताने निवडून येत असायचा, पण कै. एस जी हुलवळे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले व त्यांच्या जागेवरती डॉक्टर संकेत हुलवळे यांना संधी देण्यात आली व ते संस्थेचे अध्यक्षही झाले पण आता चित्र वेगळे आहे कै. एस जी हुलवळे यांचे चिरंजीव डॉक्टर संकेत हुलवळे यांचा वेगळा पॅनल होत असल्याची सूत्रांनी माहिती सांगितली आहे व एम एस गायकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा पॅनल जाहीर झाल्याची सूत्रांनी माहिती सांगितली त्यामुळे यावेळेस ही लढत खूप मोठया चुरशीची होणार असल्याचे सर्व विभागांमधून चर्चा चालू आहे, एम एस गायकर यांचा संस्थापक पॅनल उमेदवार जाहीर झाले आहे, तर डॉक्टर संकेत हुलवळे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा पॅनलचे उमेदवार दिनांक 20 रोजी घाटकोपर पंतनगर येथे जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे,
“कोण होणार विनर हे येत्या 6 एप्रिल ला मतदार आपल्या पेटीमधून दाखवून देणार आहे”
संस्थापक पॅनल V/s जनसेवा पॅनल



