Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

 

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

नवी मुंबई – कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल स्नॅचिंगचा गुन्हा दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी CR No. 390/2025, BNS कलम 304(2) नुसार नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात सराईत गुन्हेगार मुस्तफा रफिक खान (वय ४२ वर्षे) याने एका व्यक्तीचा Vivo कंपनीचा अंदाजे १५,०००/- रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

सदर मोबाईलमध्ये फिर्यादीचे महत्वाचे शैक्षणिक कागदपत्रे असल्यामुळे, BNSS कलम 106 नुसार तात्काळ हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला. आरोपीस तत्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्यास जामीन नाकारून न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

या आरोपीविरुद्ध लष्कर पोलीस ठाणे (पुणे शहर) तसेच CST रेल्वे पोलीस स्टेशन येथे पूर्वीही अनेक गुन्हे नोंद असून, तो सराईत गुन्हेगार आहे. प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अधिनाथ बुधवंत (वाशी विभाग) यांनी नमूद आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तत्काळ तयार करून न्यायालयात सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप दुपटे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी API बोडके यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून, केवळ २४ तासांच्या आत दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले.

— औदुंबर पाटील
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे पोलीस ठाणे

Related posts

अकोले तालुक्यातील मन्याळे येथे  आईसह दोन मुलींची आत्महत्या

jantechasavdhanmaharashtra

आमदार गणेश नाईक यांच्या आरोपांचा बाण शिवसेनेच्या वर्मी? “तर”नगरविकास विभागाकडून ‘तो’ निर्णय रद्द

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

Leave a Comment