Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल*

*शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल*

मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटावर तीव्र शब्दांत टीका केली. “आमचा मेळावा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे, तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे,” अशा शब्दांत शिंदे यांनी निशाणा साधला.

शिंदे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्व, बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसविरोधी भूमिका, तसेच कार्यकर्त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करत उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक थेट सवाल उपस्थित केले.

“८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण” – शिंदे यांचा बाळासाहेबांच्या विचारांना पुनः उच्चार

एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्या पक्षात होत असलेली वाढ ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हेच आमचे धोरण असून, हे बाळासाहेबांच्या तत्वांचे प्रतिबिंब आहे.”

“बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी” – काँग्रेसशी युतीवरून टीका

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले, “बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेनेला बांधले गेले. हे महाराष्ट्राशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी आहे.”

“सत्तेसाठी तडजोड शक्य नाही”

“हिंदुत्वासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड केली नाही, ना करणार,” असे स्पष्ट करत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. “निवडणुका आल्या कीच काही जणांना कार्यकर्त्यांची आठवण येते,” अशी टोलेबाजी करत “हम दो, हमारे दो” या शब्दांत अप्रत्यक्षपणे ठाकरेंवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न

“बाळासाहेबांनंतर तुम्ही मराठी माणसासाठी काय केले? याचा हिशोब द्या. आज म्हणता हिंदुत्व सोडले नाही, मग बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणण्यास टाळाटाळ का करता?” असे थेट सवाल करत शिंदे यांनी आपल्या भाषणाचा प्रभावी शेवट केला.

या मेळाव्यात पक्षप्रेमी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिंदे गटाने बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचा पुनरुच्चार करत पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

Related posts

शाळेच्या अल्लड वयातली धमाल गोष्ट `रंगीले फंटर` या आगामी चित्रपटातून उलगडणार आहे.

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई पालिकेचीअनधिकृत होर्डिंग विरोधी कारवाई दुसऱ्या दिवशीही सकाळपासून पहाटेपर्यंत प्रभावीपणे सुरू

*जुन्नरच्या कायदा-सुव्यवस्थेला सक्षम नेतृत्व; उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांचा जनतेचा सावधान महाराष्ट्रतर्फे गौरव*

Leave a Comment