Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

*पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारे नेतृत्व : वसंतराव मुंडे*

नवी मुंबई 
पत्रकार हा केवळ माहितीचा वाहक नसून समाजाचा आत्मा असतो. त्याच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे,” असे परखड मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. वसंतराव मुंडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या पत्रकार कार्यशाळेत व्यक्त केले.

पत्रकार शाळेत सहभागी झालेल्या नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मुंडे यांनी पत्रकारितेतील मूल्यांची आणि नैतिकतेची आठवण करून दिली. “माध्यमे बदलत आहेत, तंत्रज्ञान बदलत आहे, पण पत्रकारितेचा आत्मा – सत्याशी निष्ठा – कायम राहिला पाहिजे,” असे सांगताना त्यांनी उपस्थितांना जबाबदारीचे भान दिले.

वसंतराव मुंडे हे राज्यभरातील पत्रकारांचे विश्वासाचे प्रतीक बनले आहेत. पत्रकार संरक्षण कायदा कल्याण निधी, निवृत्ती वेतन, मान्यताधारक पत्रकारांना विमा व वैद्यकीय सुविधा, यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.

त्यांचा “संवाद यात्रा” उपक्रम हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पत्रकारांशी थेट संवाद साधणारा आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणारा एक अभिनव उपक्रम ठरला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांपर्यंत संघटनेची गाठ पोहोचवण्यात आणि पत्रकारांच्या व्यावसायिक सक्षमीकरणासाठी दिशा देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

कार्यशाळेत त्यांनी पत्रकार विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “पत्रकार हा जनतेचा प्रतिनिधी आहे, त्याचे लेखन समाज बदलू शकते. त्यामुळे पत्रकारितेच्या शस्त्राचा वापर जबाबदारीने करा.”

त्यांच्या निर्भीड, पक्षनिरपेक्ष आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेमुळे वसंतराव मुंडे यांना संपूर्ण राज्यभरातील पत्रकारांकडून आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे पत्रकार समाजात नवचैतन्याचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts

विनापरवानगी उभारण्यात आलेल्या होर्डिंगवर वाशी विभागाची कारवाई ! वाशी विभाग अधिकारी सागर मोरे

jantechasavdhanmaharashtra

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळ; नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित

Leave a Comment