Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

नवी मुंबई :
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाविकास आघाडीतून निवडून येणे कठीण असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा आहे. महानगरपालिका प्रभाग रचना चार नगरसेवकांची असल्याने निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांची साथ आवश्यक होती. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकल्याचे बोलले जात आहे.

पाटील यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, शिवसेनेला याचा फायदा होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

 

Related posts

चीनचे वऱ्हाड आले, संगमनेर येथील भोजदरीच्या दारात..!

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई महानगरपालिकेच्या महासभेत मालमत्ता करावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी; प्रस्ताव अखेर मंजूर*

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment