Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*वाशी वाहतूक विभागाची विशेष मोहीम; २६५ वाहनचालकांवर कारवाई*

वाशी वाहतूक विभागाची विशेष मोहीम; २६५ वाहनचालकांवर कारवाई

नवी मुंबई : वाढत्या वाहतूक कोंडीसह नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने वाशी वाहतूक विभागाच्या वतीने बुधवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. नागरिकांमध्ये वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम (वाशी वाहतूक शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्राइकिंग स्टाफच्या सहकार्याने करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान बसस्टॉपवर वाहन पार्क करणे, डबल पार्किंग करणे, फुटपाथवर वाहन उभे करणे, हेल्मेट न वापरणे, तसेच राँग साईडने वाहन चालविणे अशा विविध नियमभंगाच्या प्रकारांवर लक्ष ठेवून कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत एकूण २६५ वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ६२,००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याची जाणीव वाढावी, तसेच रस्त्यांवरील शिस्त राखली जावी हा उद्देश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम यांनी सांगितले.

यापुढेही अशा प्रकारच्या मोहीमा नियमितपणे राबविण्यात येणार असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Related posts

कोपरखैरणे मध्ये पाणी टंचाई…..नागरिक त्रस्त ; भाजपचे मा.नगसेवक व समाजसेवक आक्रमक

jantechasavdhanmaharashtra

*दोन वर्षे फरार आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या*

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

Leave a Comment