Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*घणसोलीत घरात घुसून जबरी चोरी व चाकू हल्ल्याचा गुन्हा 48 तासांत रबाळे पोलिसांनी केला उघड*

*घणसोलीत घरात घुसून जबरी चोरी व चाकू हल्ल्याचा गुन्हा 48 तासांत रबाळे पोलिसांनी केला उघड*

प्रतिनिधी:- कुंडलिक कानगुडे

नवी मुंबई : घणसोलीतील सदगुरू हॉस्पीटल शेजारील झोपडपट्टी परिसरात घरात घुसून मोबाईल चोरी करताना फिर्यादीवर चाकू हल्ला करणाऱ्या दोन विधीसंघर्षित बालकांचा शोध घेऊन रबाळे पोलिसांनी अवघ्या 48 तासांत गुन्हा उघड केला आहे. विशेष म्हणजे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या थेट मार्गदर्शनाखाली अत्यंत काटेकोरपणे हाती घेण्यात आली. त्यांच्या दिशादर्शनामुळे तपास पथकाला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि आरोपी शोधण्यास मोठी मदत झाली.

फिर्यादी राजू साईनाथ कुमार, वय 30 वर्ष, रा. सदगुरू हॉस्पीटल शेजारील झोपडपट्टी, यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना 29 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. दोन इसमांनी त्यांच्या घरात परवानगीशिवाय प्रवेश करून मोबाईल चोरी केला. फिर्यादी यांनी प्रतिकार केल्यावर आरोपींनी चाकूने पोट व पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर सायन हॉस्पिटलच्या सर्जरी वॉर्डमधून दिलेल्या तक्रारीवरून 1 डिसेंबर रोजी गुन्हा नोंद झाला.

गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी स्वतः तपासाची दिशा निश्चित केली. त्यांच्या आदेशानुसार पो.नि. सचिन गवळी (गुन्हे) व पो.नि. श्याम बनसोडे (प्रशासन) यांच्या देखरेखीखाली सपोनि अविनाश पाळदे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने काम सुरू केले. घटनास्थळाची पाहणी, सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीद्वारे पथकाने दोन्ही विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला.

तपास पथकात सपोनि अविनाश पाळदे, पोहवा प्रसाद वायंगणकर, पोना विजय करंकाळ, पोना प्रल्हाद जाधव, पोशि प्रविण भोपी, पोशि अभिजीत राळे, पोशि राजेश तडवी आणि पोशि राहुल साळुंखे यांचा समावेश होता.

संपूर्ण कारवाईवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी बारकाईने लक्ष ठेवले. त्यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघड झाला असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तातडीच्या व प्रभावी कामगिरीचे कौतुक केले आहे.

Related posts

महापे वाहतूक शाखेच्या वतीने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकी संदर्भात जनजागृती

वॉर्ड क्र 100 आर.आर.पाटील उद्द्यानाची म.न.पा अधिकारी यांनी केली पाहणी…

jantechasavdhanmaharashtra

वाशी वाहतूक विभागाचे टॅक्सी व रिक्षा चालकांना वाहतूकीच्या नियमांचे मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment