Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*सभागृह नेतेपदी सागर नाईक तर विरोधी पक्ष नेतेपदी विजय चौगुले*

*सभागृह नेतेपदी सागर नाईक तर विरोधी पक्ष नेतेपदी विजय चौगुले*

जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या प्रशासकीय व राजकीय नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासन अधिकारी तथा महापौर सुजाता पाटील यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 19(1)(अ) अन्वये सभागृह नेता म्हणून सागर ज्ञानेश्वर नाईक यांची, तर कलम 19(1)(अअ) अन्वये विरोधी पक्ष नेता म्हणून विजय लक्ष्मण चौगुले यांची अधिकृत नियुक्ती जाहीर केली.

या प्रसंगी नवनियुक्त सभागृह नेता व विरोधी पक्ष नेते यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत तसेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सभागृहात उपस्थित सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात या नियुक्त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, याच सभेत नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीवर १६ सदस्यांची नेमणूक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये जयवंत सुतार, सुधाकर सोनवणे, शशिकांत भोईर, अशोक पाटील, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, संदीप म्हात्रे, प्रदीप गवस, सुरेश शेट्टी, सागर नाईक, आकाश मढवी, अनिता पाटील, मंदाकिनी म्हात्रे, दिपाळी सकपाळ, सुरेश कुलकर्णी आणि सरोज पाटील यांचा समावेश आहे.

या सर्व नवनियुक्त स्थायी समिती सदस्यांचेही महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईच्या विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन यावेळी महापौरांनी केले.

Related posts

नवी मुंबई पालिकेचे अधिकारी प्रवीण गाडे हे कायदा पायदळी तुडवतात का?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे 

jantechasavdhanmaharashtra

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत 19 हजार 460 पदांची मेगा भरती; 5 ऑगस्ट पासून चालू

अवैध / अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment