Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

*कर वसुलीत नवा इतिहास; आयुक्त कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त अमोल पालवे यांची प्रभावी कामगिरी*

*कर वसुलीत नवा इतिहास; आयुक्त कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमोल पालवे यांची प्रभावी कामगिरी*

प्रतिनिधी :- जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर विभागाने अल्पावधीतच ऐतिहासिक कामगिरी करत अवघ्या वीस दिवसांत विक्रमी कर वसुलीची नोंद केली आहे. आयुक्त कैलास शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि उपायुक्त अमोल एकनाथ पालवे यांच्या सहकार्याने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य करण्यात आली आहे.

कर विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमोल पालवे यांनी आपल्या टीमसह प्रभावी नियोजन, वेगवान अंमलबजावणी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती राबवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने एकजुटीने काम करत थकबाकीदार यांच्याशी समन्वय साधत कर भरण्याची आपले जबाबदारी ची जाणीव करून देत करदात्यांमध्ये जनजागृती घडवून आणली.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहराच्या विकासासाठी कर भरणे ही जबाबदारी असल्याची जाणीव अधिक दृढ झाली आहे. या कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे.

आयुक्त कैलास शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वासह उपायुक्त अमोल पालवे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या समन्वयातून साकारलेली ही यशोगाथा सध्या सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.

Related posts

*गृहनिर्माण संस्थांवरील झाड छाटणी शुल्क रद्द करा; नगरसेवक सुनील कुरकुटे यांची आयुक्तांकडे ठाम मागणी*

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

jantechasavdhanmaharashtra

स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती APMC कांदा बटाटा मार्केट येथे साजरी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment