Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*रबाळे पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद; अमली पदार्थविरोधी कारवाईसह सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर*

*रबाळे पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान पोलीस आयुक्तांचा नागरिकांशी थेट संवाद; अमली पदार्थविरोधी कारवाईसह सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रबाळे पोलीस स्टेशनच्या वार्षिक निरीक्षणानिमित्त आयोजित विशेष बैठकीत मा. पोलीस आयुक्तांनी रबाळे, ऐरोली व घणसोली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी व नगरसेवकांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत परिसरामध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थ विक्री व सेवनाच्या घटनांबाबत नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त करत संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच ऐरोली व घणसोली परिसरात वाढती लोकसंख्या व सुरक्षेच्या दृष्टीने नवीन पोलीस बीट चौक्या सुरू करण्याची आवश्यकता नागरिकांनी मांडली. वाहतूक कोंडी, सुरक्षाविषयक उपाययोजना, रात्रीच्या गस्त व्यवस्था, सार्वजनिक ठिकाणांवरील संशयास्पद हालचाली तसेच दैनंदिन नागरी समस्यांबाबतही विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

मा. पोलीस आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना नवीन बी.एन.एस. कायद्याबाबत माहिती देत कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल समजावून सांगितले. तसेच अमली पदार्थविरोधी विशेष मोहीम, सायबर गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना आणि नवी मुंबई पोलिसांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती व सुरक्षा उपक्रमांची माहितीही त्यांनी नागरिकांसमोर मांडली. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

परिसरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, तसेच पोलिसांच्या तपासकार्याला सहाय्यभूत ठरेल अशा पद्धतीने यंत्रणा विकसित करण्यात येईल, अशी ग्वाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी बैठकीत दिली.

या बैठकीस शिवसेना गटनेते नगरसेवक मनोज हळदणकर, नगरसेवक बंडू केनी, राजेश मडवी, अंकुश सोनवणे, आकाश मडवी, साहिल चोगुले, अनिकेत म्हात्रे, वैशाली रेवेंद्र पाटील, पूजा राजू पाटील, ऐश्वर्या अंकुश सोनवणे, हेमांगी अंकुश सोनवणे, श्रेया सुदर्शन जिरगे, समाजसेविका संध्या सावंत, मीनाक्षी दांगट, डॉ. शिल्पा केशवाणी, डॉ. निशिकांत बर्फे, डॉ. सचिन पाटील, समाजसेवक सुधीर कुमठेकर, गगनदीप कोहली यांच्यासह रबाळे, ऐरोली व घणसोली परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मा. पोलीस आयुक्तांनी दिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related posts

पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ ..! लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

घणसोली विभागात विविध ठिकाणी अतिक्रमणाचा सुळसुळाट कुंपणच शेत खात असेल!.. तर कारवाई कोण करणार? संतप्त नागरिकांचा सवाल!.

अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी चा मेळावा एपीएमसी मार्केट येथे संपन्न

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment