Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*जुन्नरमध्ये दुचाकी चोरी प्रकरणांचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद*

*जुन्नरमध्ये दुचाकी चोरी प्रकरणांचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यात घडलेल्या दुचाकी चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे १ लाख १० हजार रुपये किमतीच्या दोन चोरीस गेलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

जुन्नर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८०/२०२६ अन्वये दि. २९ मार्च २०२६ रोजी परीटवाडी येथून शाईन कंपनीची दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच गु.र.नं. ११४/२०२६ अन्वये दि. २४ एप्रिल २०२६ रोजी जुन्नर शहरातून बुलेट मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली होती. दोन्ही गुन्हे भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार दाखल करण्यात आले होते.

सदर गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर पद्धतीने सुरू करण्यात आला. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता आरोपी चोरीनंतर ओतूरच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ओतूर परिसरात गोपनीय माहितीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित केली असता समर्थ बाळासाहेब ढगे (वय १८, रा. ५२ गल्ली, ओतूर) व अथर्व सचिन साबळे (वय २०, रा. ओतूर) हे दोघे विनानंबर प्लेटची शाईन मोटारसायकल वापरत असल्याची माहिती समोर आली.

दि. ७ मे २०२६ रोजी आरोपी कुमशेत फाटा, जुन्नर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत आरोपींनी दुचाकी चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या दोन्ही मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना जुन्नर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक फौजदार दिपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमिन, संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले व अभिमन्यू मोटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

सीसीटीव्ही तंत्रज्ञान, गोपनीय माहिती आणि पोलिसांच्या तत्पर तपासामुळे दुचाकी चोरी प्रकरणांचा वेगाने उलगडा झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts

*नवी मुंबई महापालिका निवडणूक 2025-26 : कोपरखैरणे विभागात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ, सभागृहात गर्दी वाढली*

jantechasavdhanmaharashtra

सदगुरू परिवाराच्या साक्षीने सचिन धर्माधिकारी यांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान..

jantechasavdhanmaharashtra

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला.!

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment