Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजशहर

*दोन वर्षे फरार आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या*

*दोन वर्षे फरार आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या*

प्रतिनिधी :-कैलास बोडके

जुन्नर : आर्थिक फसवणूक करून गेली दोन वर्षे फरार असलेल्या आरोपीला चंदननगर पोलिसांच्या पथकाने नवी मुंबईतील सानपाडा परिसरातून शिताफीने अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोलेवाडी, कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप भोसले (वय ३८, रा. येरवडा) यांची १८ डिसेंबर २०२२ रोजी आरोपी दत्तात्रय तावरे याने विश्वास संपादन करून फसवणूक केली होती. आरोपीने प्रथम १० हजार रुपये घेतले आणि त्यानंतर दोन दिवसांसाठी पत्नीची सोन्याची गंठण घेऊन मणप्पुरम गोल्ड लोन, चंदननगर येथून १ लाख २७ हजार ५०० रुपयांचे तारण कर्ज काढून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपीने आणखी तीन व्यक्तींनाही अशाच प्रकारे फसवल्याचे उघडकीस आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपला पत्ता, मोबाईल क्रमांक बदलून बँक खातेही बंद केले होते. त्यामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार किरण घुटे यांनी आरोपीचे विविध मोबाईल क्रमांक तांत्रिक पद्धतीने तपासले. त्यातील एका सुरू असलेल्या मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरून आरोपी सानपाडा, नवी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली.

दि. १४ मे २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे आणि विक्रम गायकवाड यांच्या पथकाने सानपाडा येथे जाऊन स्थानिक गोपनीय बातमीदारांच्या मदतीने दाटीवाटीच्या परिसरातून आरोपी दत्तात्रय तावरे याला ताब्यात घेतले.

आरोपीला दि. १५ मे २०२६ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Related posts

कोपरखैरणे मध्ये पाणी टंचाई…..नागरिक त्रस्त ; भाजपचे मा.नगसेवक व समाजसेवक आक्रमक

jantechasavdhanmaharashtra

रस्ता सुरक्षा सप्ताह2024 अंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra

नागरीकांनी डोळ्यांची तपासणी तसेच काळजी घेणे आवश्यक-डॅा.प्रतिक तांबे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment