Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

*एपीएमसी पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष नेतृत्वाची साथ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांचा सन्मान*

 

*एपीएमसी पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष नेतृत्वाची साथ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांचा सन्मान*

प्रतिनिधी:- जनतेचा सावधान महाराष्ट्र

एपीएमसी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आबासाहेब पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव केला.

यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आबासाहेब पाटील यांनी आपल्या स्पष्ट आणि ठाम भूमिकेतून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. तसेच परिसरातील बेकायदेशीर व अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाई करून त्यांना आळा घालण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी अंकुश ठेवत सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या नियुक्तीमुळे एपीएमसी परिसरातील नागरिकांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मात्र कायद्याचा धाक निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली एपीएमसी पोलीस स्टेशनची कार्यक्षमता अधिक बळकट होईल, तसेच जनतेच्या हिताला प्राधान्य देणारे निर्णय घेत परिसरात शांतता, सुरक्षितता आणि कायद्याचे राज्य अधिक प्रभावीपणे प्रस्थापित होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related posts

*रबाळे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

राज ठाकरे यांनी टोल मुक्त आंदोलन केले ते योग्य होते का अयोग्य ?

jantechasavdhanmaharashtra

*शरद पवार गटाची उमेदवारांची संभाव्य यादी*

Leave a Comment