Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*रबाळे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; सुमारे ३० लाखांचे १८३ हरविलेले मोबाईल नागरिकांना परत*

*रबाळे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; सुमारे ३० लाखांचे १८३ हरविलेले मोबाईल नागरिकांना परत*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील रबाळे पोलीस ठाण्याने हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या मोहिमेत आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या माध्यमातून सुमारे ३० लाख रुपये किमतीचे एकूण १८३ हरविलेले मोबाईल शोधून संबंधित नागरिकांच्या ताब्यात देण्यात आले.

हरविलेल्या मोबाईलचा प्रभावी शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. या पथकात महिला पोलीस अंमलदार अश्विनी मेंगडे तसेच पोलीस अंमलदार प्रसाद वायंगणकर, स्वप्नील मंडलिक आणि विजय करणकाळ यांचा समावेश होता.

सदर पथकाने CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर हरविलेल्या मोबाईलची नोंदणी करून तांत्रिक विश्लेषण, डिजिटल ट्रॅकिंग आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात हरविलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश आले.

यापूर्वीही रबाळे पोलिसांनी २१४ हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत केले होते. त्यानंतर आता आणखी १८३ मोबाईल नागरिकांच्या ताब्यात देण्यात आल्याने रबाळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

हरविलेला मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी रबाळे पोलिसांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत समाधान व्यक्त केले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त विजय खरात तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक (प्रशासन) श्याम बनसोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळदे, महिला पोलीस अंमलदार अश्विनी मेंगडे तसेच पोलीस अंमलदार प्रसाद वायंगणकर, स्वप्नील मंडलिक आणि विजय करणकाळ यांनी विशेष परिश्रम घेत ही उल्लेखनीय कामगिरी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Related posts

*निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती, काय आहेत निकष?*

पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर शक्यता ? मोदी सरकार दोन दिवसात मोठा ‘धमाका’ करण्याच्या तयारीत

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबईचे शिल्पकार,माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर…

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment