Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*राजू थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; घणसोलीतील धोकादायक झाडाची तातडीने छाटणी, नागरिकांकडून कौतुक*

*राजू थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; घणसोलीतील धोकादायक झाडाची तातडीने छाटणी, नागरिकांकडून कौतुक*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : घणसोली सेक्टर-१ येथील ओमकार सोसायटी परिसरातील धोकादायक झाडाबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर झाड कोसळून वाहनांचे नुकसान झाले. तसेच वीज खांब व केबलचेही नुकसान झाल्याने परिसरात काही काळ धावपळ उडाली. या घटनेनंतर समाजसेवक राजू थोरात यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या घणसोली वॉर्ड कार्यालयाकडे पाठपुरावा करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईची मागणी केली.

राजू थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तात्काळ घटनास्थळी पथक पाठवून धोकादायक झाडाची छाटणी करत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

स्थानिक नागरिकांनी समाजहितासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या समाजसेवक राजू थोरात यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाचे लक्ष वेधल्यामुळेच प्रशासनाला तातडीने कारवाई करावी लागली, अशी भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली.

यावेळी समाजसेवक राजू थोरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, परिसरातील धोकादायक झाडे, अतिक्रमण किंवा नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाबींकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास स्थानिक नागरिकांच्या हितासाठी आणि समाजसेवेच्या उद्देशाने घणसोली वॉर्ड कार्यालयावर तीव्र मोर्चा काढण्यात येईल. नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.

समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देणारे समाजसेवक राजू थोरात यांच्या या तत्पर आणि लोकहितवादी भूमिकेचे परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

Related posts

राहुल कर्डिले, भाप्रसे यांनी स्वीकारला सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार

*पनवेलमध्ये डंपरची स्कूल व्हॅन व रिक्षाला धडक;  मुलांसह जखमींची सुखरूप सुटका,*

*कोपरखैरणेतील न्यू हिमगिरी हौसिंग सोसायटीत स्लॅब कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र पुनर्विकासातील विलंबामुळे रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*

Leave a Comment