Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसांसह तिघा आरोपींचा पर्दाफाश*

*कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसांसह तिघा आरोपींचा पर्दाफाश*

 

कोपरखैरणे, नवी मुंबई :– कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने सतर्कतेने कारवाई करत देशी बनावटीचा गावठी कट्टा व सहा जिवंत काडतुसांसह तिघा संशयितांना ताब्यात घेत अटक केली आहे.

दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस हवालदार ललित महाजन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सेक्टर 23, कोपरखैरणे येथील शांतिदूत महावीर उद्यानाजवळील सार्वजनिक बाथरूम शेजारी, पेट कॉर्नरजवळ तिघेजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळले. त्वरित कारवाई करत पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता –

* **एक देशी बनावटीचा लोखंडी कट्टा** (किंमत रु. 30,000/-) – लांबी अंदाजे 13 सेमी., बॅरेल लांबी 8 सेमी., लाकडी मुठ, ट्रिगर व ट्रिगर गार्डसह.
* **सहा जिवंत पितळी काडतुसे** (किंमत रु. 6,000/-) – राखाडी रंगाची बुलेट

**अटक आरोपींची माहिती:**

1. सौतमरतन प्रकाश सिंग (वय 24, चालक), रा. से. 19, कोपरखैरणे; मूळ रा. बदायु, उत्तर प्रदेश.
2. पिंटु सोमपाल कुमार (वय 22, शेतकरी), रा. से. 19, कोपरखैरणे; मूळ रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश.
3. अभय बॉबी राजपुत (वय 24, चालक), रा. से. 19, कोपरखैरणे; मूळ रा. बदायु, उत्तर प्रदेश.

सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश शेडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ पंकज डहाणे व सहाय्यक पोलीस आयुक्त रबाळे विभाग राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक उन्मेष थिटे, पो.उ.नि. उमेश शेडगे, पो.ह. ललित महाजन, पो.ह. चिकणे, पो.शि. दोंदे, परदेशी, भांगरे, कानवडे, साळुंखे व यादव यांनी केली.

Related posts

*एपीएमसी पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष नेतृत्वाची साथ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांचा सन्मान*

चालू ट्रेन मधून मोबाईल चोरून पसार होणाऱ्या चोरास रेल्वे पोलिसांनी केली अटक

jantechasavdhanmaharashtra

महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने घेतले चार बळी.

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment