Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

कोपरखैरणे येथे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कचरा व घंटागाडी चालकांना मार्गदर्शन! सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे

नवी मुंबई (प्रतिनिधी)

कोपरखैरणे विभागामध्ये दिवसेंदिवस वाहतुक कोंडीचा प्रश्न वाढत चालला आहे रस्ते अरुंद असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे या अनुषंगाने कोपरखैरणे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी घंटागाडी चालकांना एकत्रित बोलावून


दिनांक 25 जून रोजी दुपारी 12:00 ते 01:00 या वेळेत डम्पिंग यार्ड कोपरखैरणे येथे कचरा गाडी घंटागाडी यांच्या चालकांची बैठक बोलावून कोपरखैरणे व घनसोली भागात अरुंद रस्ते असल्याकारणाने तसेच सकाळी शाळा कॉलेज व कामावर जाणाऱ्या लोकांची घाई असताना त्यातच कचरा गाडी मुळे होणारे वाहतूक कोंडी यावर कसा मार्ग काढता येईल दोघांनाही त्यांचे काम सुखकर कसे होईल याबाबत कचरा गाडी, घंटा गाडी यांच्या सर्व चालकांची बैठक घेऊन त्यांना शाळेच्या वेळेत व पिकावर्समध्ये कशा पद्धतीने काम करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच वाहतुकीचे नियम मोडणार नाहीत आणि मोडले तर उचित कारवाई करण्यात येईल याबाबत समज देखील देण्यात आली
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा कोपरखैरणे विश्वास भिंगारदिवे यांनी कोपरखैरण्यासारख्या नेहमीच वाहतूक कोंडी होणाऱ्या विभागामध्ये वेळोवेळी रिक्षाचालक वाहन चालक स्कूल बस चालक व इतर वाहनांच्या चालकांना देखील मीटिंग बोलून मार्गदर्शन केल्यामुळे कोपरखैरणे विभागामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे

शिवशक्ती वाहतूक सेवाभावी संस्था विद्यार्थी विभागाने व  अध्यक्ष संभाजी जाधव यांनीही विशेष आभार व्यक्त केले आहे

Related posts

वाॅर्ड क्र. १०० मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटने संप्पन्न.

jantechasavdhanmaharashtra

सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे फायनान्शियल क्लोजर पूर्ण*

jantechasavdhanmaharashtra

साताऱ्याचा उमेदवार ठरला; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांची यादी

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment