Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

*कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई*

कोपरखैरणे (प्रतिनिधी)
कोपरखैरणे पोलिस वाहतुक शाखेकडुन वाहतुक सुरक्षा व नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच बरोबर विशेष मोहीम राबवुन वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या व्यक्ती विरोधात विशेष कारवाई देखील केली जाते. फेब्रुवारीच्या महिन्याभरात मा. पोलीस उपआयुक्त तिरूपती काकडे, वाहतुक, नवी मुंबई यांच्या संकल्पनेतुन व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात आल्या होत्या. या मोहीमेअंतर्गत कोपरखैरणे वाहतुक शाखेचे मा.. सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे व त्यांच्या अधिनस्त पोलीस अमंलदार यांनी प्रभावी कारवाई केली. त्यात विना हेल्मेट प्रवास, सिग्नल जम्पिंग, दारू पिऊन वाहन चालविणे, नोपार्किग इतर वाहतुकीचे नियम न पाळणे अशा एकुण २५३५ दंडात्मक वाहनांवर कारवाई करून ५५,५००/- रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर अशाच प्रकारे पुढील काळातही कारवाई करण्यात येतील अशी माहिती मा. सपोनि विश्वास भिंगारदिवे यांनी दिली.

Related posts

दिवसा घरफोडी करणा-या ०५ सराईत आरोपींना सीबीडी पोलीसांनी अटक करून केली ०४ गुन्हयांची उकल.*

jantechasavdhanmaharashtra

*विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी सुरक्षा संदेश; सेवा सहयोगी ट्रस्टकडून ३०० हेल्मेटचे वाटप*

*निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती, काय आहेत निकष?*

Leave a Comment