Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घणसोली सेंट्रल पार्क असुविधा च्या विळख्यात ?

 

प्रतिनिधी अमोल होजगे

*घणसोली सेंट्रल पार्क असुविधा च्या विळख्यात?*

गेले दोन वर्ष झाले असतील घणसोली सेंट्रल पार्क चे उदघाटन होऊन अनेक घणसोलीकरांची या सेंट्रल पार्क मध्ये ये-जा चालू असते. खूप मोठ्या संख्येने लहान मुलं या ठिकाणी खेळताना दिसून येतात.

पूर्वी लोकप्रतिनिधी ह्यांचे आप-आपसात वाद असल्याकारणाने ह्या सेंट्रल पार्कचे उदघाटन लांबणी वर गेले. नागरिकांच्या अनेक तक्रारी नंतर प्रशासनाने पार्क प्रत्यक्ष घणसोलीकरांसाठी खुले केले .

विशेष बाब म्हणजे या पार्क मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १७.५० कोटी खर्च करून सुद्धा पार्क हे अधुरेच म्हणावे लागेल त्याचे कारण असे आहे की उद्घाटन नंतर सुद्धा अद्याप २ वर्ष उलटून गेले तरी या पार्क मध्ये असलेले ‘जलतरण तलाव’ हे अजूनही का सुरु झाले नसून त्याचे कारण नागरीकांना अजूनही समजले नाही.

घणसोलीकरांनी अनेक वेळा हा प्रश्न पालिकेच्या अधिकारी यांना सांगून सुद्धा त्यांनी तेथे प्रत्यक्ष पाहणी केली नाही. संबंधित अधिकारी यांच्या वर आयुक्त यांनी कार्यवाही करावी असे इथले नागरिक आव्हान करत आहे.

Related posts

*सिडकोच्या कळंबोली नोडमध्ये अतिक्रमण विरोधी मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी*

कोपरखैरणे येथे वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी कचरा व घंटागाडी चालकांना मार्गदर्शन! सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे

jantechasavdhanmaharashtra

तुर्भे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment