Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*ठाणे जिल्ह्यात प्रथम येत संस्कृत सावंतची शैक्षणिक झेप; माजी मुख्याध्यापक खुशाल चौधरी यांच्याकडून ५ हजार रुपयांचे पारितोषिक*

*ठाणे जिल्ह्यात प्रथम येत संस्कृत सावंतची शैक्षणिक झेप; माजी मुख्याध्यापक खुशाल चौधरी यांच्याकडून ५ हजार रुपयांचे पारितोषिक*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

नवी मुंबई : जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि गुणवत्तेच्या बळावर यशाचे शिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी परंपरा आहे. याच परंपरेला साजेसा आदर्श निर्माण करत फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. संस्कृत तानाजी सावंत याने तब्बल २७० गुण मिळवत ठाणे जिल्हा शहरी सर्वसाधारण गटातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित शुभेच्छा समारंभात शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री. खुशाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळत कु. संस्कृत सावंत याला ५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करून त्याचा सन्मान केला. तसेच या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षक व वर्गशिक्षकांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रेरणादायी कार्यक्रमाला सेवानिवृत्त केंद्र समन्वयक श्री. संजय मोरे, शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. राजाराम पवार, संघटनेचे सरचिटणीस श्री. आत्माराम आग्रे, श्री. बबन दरेकर, श्री. महेंद्र रवीढोणे, मार्गदर्शक श्री. संतोष मुंढे, वर्गशिक्षक श्री. हरिचंद्र फर्डे, सौ. शोभा बुक्कानुरे, सौ. वर्षा शिंदे, सौ. स्मिता पुकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना म्हात्रे व सर्व शिक्षकांनी कु. संस्कृत सावंत याचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाचा सन्मान करण्याची श्री. खुशाल चौधरी यांची ही कृती अत्यंत कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत अधिक प्रेरणा निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यात आणखी मोठी यशस्वी भरारी घेण्यास निश्चितच बळ मिळणार आहे.

Related posts

देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत माथाडी भवन येथे कोरोना लसीकरण शिबिराचे उदघाटन केले

jantechasavdhanmaharashtra

*शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल*

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment