Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजशहर

तुर्भे वार्ड ऑफिस येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

तुर्भे वार्ड ऑफिस येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

 

नवी मुंबई (प्रतिनिधी)

आज 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिम्मित तुर्भे वार्ड ऑफिस येथे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण वार्डमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी बाबासाहेब यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ वाहून पूजन करण्यात आले व महापरिनिर्वाण दिनानिम्मित तुर्भे वार्ड ऑफिस येथे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या व बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान आज देशासाठी इतिहास घडवून गेले संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला घडविले अशा महापुरुषाला त्रिवार अभिवादन

Related posts

हे शासन उद्योगांना सर्वोतोपरी मदत करणारे* *- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

jantechasavdhanmaharashtra

चिंचवड पोटनिवडणुकित भाजपच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय

jantechasavdhanmaharashtra

शासकीय योजनांमध्ये पत्रकारांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार..

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment