Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नगर-पुणे ‘वरील वाहतूक व्यवस्थेत बदल

*नगर-पुणे ‘वरील वाहतूक व्यवस्थेत बदल*

अ.नगर:-( प्रतिनिधी)

भिमा-कोरेगाव जवळील पेरणे फाटा येथील जय स्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेत मोठे फेरबदल करण्यात आले आहे.
३१ डिसेंबर ते २ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हे फेरबदल असतील. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांनी तशा प्रकारचे आदेश पारित केले आहे.

नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कायनेटीक चौक, अरणगाव बायपास, बेलवंडी, काष्टी, दौंड, सोलापूर-पुणे महामार्गे पुण्याकडे जातील. तसेच बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणारी वाहने बेलवंडी फाटा- देवदैठण धावलगाव पिंपरी कोळंडर- उक्कडगाव-बेलवंडी-अहमदनगर दौंड महामार्गावरुन -लोणी व्यंकनाथ मढे वडगाव काष्टी-दौंड-सोलापुर पुणे मार्गे पुणेकडे जातील.
अहमदनगरकडून पुणेमार्गे मुंबई, नवी मुंबई, ठाणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक कल्याण बायपास आळेफाटा-ओतुर-माळशेज घाट मार्गे जातील. बेलवंडी फाटा येथून पुणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हा आदेश शासकीय वाहने, पेरणे येथे जय स्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या नागरीकांची वाहने, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड व आवश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नसल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

हजार, लाख की कोटी… तुम्ही घरात किती कॅश ठेवू शकता?

jantechasavdhanmaharashtra

दिघागाव रेल्वे स्थानक सुरू करा… नाहीतर जनतेच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागेल – खासदार राजन विचारे*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment