Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजराजकीय

*मा आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मोफत चष्मा वाटप; सुनील सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*मा आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते मोफत चष्मा वाटप; सुनील सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र

समाजसेवक सुनील सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजहिताला प्राधान्य देत वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास माजी आमदार संदीप नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी सुनील सुतार यांचे अभिष्टचिंतन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना माजी आमदार संदीप नाईक यांनी वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविणे ही खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. सुनील सुतार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य शिबिर व मोफत चष्मा वाटपाचा उपक्रम आयोजित करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. लोकहिताला प्राधान्य देणारे असे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घेतला. समाजातील गरजू नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे असे उपक्रम खऱ्या अर्थाने लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी सुनील सुतार यांचे विशेष कौतुक केले व त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा दिल्या.

Related posts

जादुगार पी.बी.हांडे याची “मँजिक बुक आँफ रेकाँर्ड” मध्ये नोंद*

jantechasavdhanmaharashtra

दिघा येथे अनाथ आश्रम आहे! पण त्याला कोणी वाली नाही असं म्हणावं लागेल.

सराईत घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगाराला पुणे पोलिसांने केली अटक

Leave a Comment