Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

कोपरखैरणे तलाव दुर्गंधीच्या विळख्यात ?

 

अमोल होजगे – प्रतिनिधी कोपरखैरणे

 

*कोपरखैरणे तलाव दुर्गंधीच्या विळख्यात.?*

नवी मुंबई कोपरखैरणे येथील सेक्टर-१९ मधील ‘धारण तलाव’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे. नवी मुंबई महानगर पालिकेने ह्या तलावाचे छान असे सुशोभीकरण करून तलावाची शोभा वाढवली, पण कालांतराने येथे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. येथे रोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. सकाळी मॉर्निंग वॉक त्यानंतर संध्याकाळी बरेच नागरिक व पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी आणतात.

पण आता ह्या तलावाच्या अवती भोवती दुर्गंधी पसरलेली आहे, त्यामुळे येथील नागरिक खूप त्रस्त झाले आहे, त्यात घनकचरा विभागाचे होत असलेले दुर्लक्ष हे मोठे कारण म्हणावे लागेल.

त्यात दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जन झाले, त्या नंतर ज्या देवीच्या मुर्त्या बाहेर काढण्यात आल्या त्या अजूनही तेथून उचलण्यात आलेल्या नाहीये, त्या मूर्त्यांची अवस्था ही पाहवत नाही, घनकचरा विभागाने वेळीच लक्ष घालून हे स्वछ करायला हवे होते. पण तसे काही होताना दिसत नाहीये .

म्हणून येथील स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा मोठा प्रश्न असून त्यांनी वारंवार पालिकेच्या अधिकारी यांना तक्रार करून सुद्धा काही कार्यवाही झाली नाही, परंतु आता घनकचरा विभागाचे उपायुक्त यांना पाहणी करून अधिकारी यांना सूचना द्याव्या अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत.

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांचा मनोज जरांगे पाटील यांना टोला.!

jantechasavdhanmaharashtra

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यविधी*

Leave a Comment