Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

अपोलो कॅन्सर सेंटरकडून एन्ड-ओ-चेक शिबीराचे आयोजन

येत्या काळात दर लाख महिलांमागे ४.६ महिलांना अंडाशयाचा २.५ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची भीती

नवी मुंबई, ३० जुलै २०२५ : महिलांना कर्करोगाची बाधा होऊ नये म्हणून नवी मुंबईतील अपोलो कॅन्सर सेंटरने एका विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. अपोलो कॅन्सर सेंटरने महिलांमधील कर्करोगावर नियंत्रण यावे म्हणून तपासणी तसेच आवश्यक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत कटिबद्धता दर्शवली आहे. आपल्या धोरणाशी सुसंगत भूमिका म्हणून अपोलो कॅन्सर सेंटरने ‘एंड-ओ-चेक’ या व्यापक मोहिमेचे आयोजन केले आहे. ४५ वयोगटाच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या महिलांच्या गर्भाशायाच्या अस्तराचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग होतो. या दोन्ही कर्करोगाच्या निदानाशी संबंधित वैद्यकी तपासणी करणे, कर्करोगाचे निदान झाल्यास तातडीने उपचार सुरु करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गर्शाशयाच्या अस्तराचा कर्करोग हा ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. ५५ ते ६४ वयोगटातील महिलांमध्ये या कर्करोगाचे निदान होत आहे. अंडाशयाचा कर्करोगाचे सरासरी निदान ६३ व्या वर्षी होते. या रोगाचे निदान लवकर झाले तर तातडीच्या उपचारानंतर पुढील पाच वर्षापर्यंत जगण्याचा दर ९० टक्क्यांपेक्षा जास्त असतो.

यंदाच्या वर्षात भारतात कर्करोगाच्या रुग्णांची संख्या १५.७ लाखापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. यामध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात अंडाशयाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महिलांमध्ये आढळणा-या पाच प्रमुख कर्करोगांपैकी अंडाशयाच्या आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या केसेस जास्त आहेत. येत्या काळात दर लाख महिलांमागे ४.६ महिलांना अंडाशयाचा तर २.५ महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बदलती जीवनशैली, शहरी राहणीमान, चयापचय विकारांमध्ये होणारी वाढ आणि प्रजननाच्या पद्धतींमधील बदल यांमुळे अंडाशयाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची लागण होते. या कारणांमुळेच महिलांमध्ये या दोन्ही कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. कर्करोगाचा विळखा वाढत असल्याने गंभीर धोका असलेल्या वयोगटातील महिलांची विशेष तपासणी करणे आवश्यक ठरते.

रक्तस्त्राव, सातत्याने स्त्राव होणे ही गर्भाशयाच्या अस्तरामध्ये होणा-या कर्करोगाची प्रमुख लक्षणे मानली जातात. परंतु अनेकदा महिला या लक्षणांबाबत डॉक्टरांना वेळीच माहिती देत नाही. परिणामी, निदानाला विलंब होतो. निदान उशिरा झाल्याने उपचारांचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होते. या दोन्ही कर्करोगाचा गंभीर धोका असलेल्या वयोगटातील महिलांची तातडीने वैद्यकीय तपासणी करणे, ४५ वर्ष पार केलेल्या महिलांना गर्भाशयाच्या अस्तराचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाच्या लक्षणांची माहिती देणे, वेळेवर उपचार सुरु करणे यासाठी ‘एन्ड-ओ-चेक’ मोहिम राबवली जात आहे. या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या स्त्रीरोगविषयक आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास बळ मिळते.

श्री.दिनेश माधवन, अध्यक्ष, ग्रुप ऑन्कॉलोजी आणि इंटरनॅशनल विभागाचे, अपोलो हॉस्पिटल्स एन्टरप्रायजेस लिमिटेड म्हणाले,‘‘कर्करोगाच्या उपचारांत वेळेवर निदान होणे फार महत्त्वाचे आहे. वेळेवर कर्करोगाचे निदान झाल्यास रुग्णाला वाचवता येते शिवाय जीवनमानाचा दर्जा सुधारतो. एन्ड-ओ-चेक या उपक्रमातून तपासणी आणि लवकर निदान होणे या दोन घटकांवर लक्ष केंद्रित केले जाते. कर्करोग व्यवस्थापन तज्ज्ञांना वेळेवर कर्करोगाचे निदान करणे तसेच अचूक उपचार करणे शक्य होते.’’

डॉ. रिचा बन्सल, लेप्रॉस्कोपिक आणि रोबॉटिक सर्जरी विभागाच्या गायनॅक ऑन्कॉलॉजी सल्लागार, अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई म्हणाल्या,‘‘४५ वर्षांवरील महिलांमध्ये गर्भशयाच्या अस्तराच्या कर्करोगाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे या कर्करोगावर उपचार होण्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक आहे. जागतिक आकडेवारीनुसार, या आजाराचे लवकर आणि एकाच ठिकाणी निदान झाल्यास पुढील ५ वर्षांसाठी ९६ टक्के रुग्णांचे प्राण वाचू शकतात. मात्र विलंबाने निदान झाल्यास जगण्याची शक्यता धूसर होते. ही भीती ध्यानात घेता लवकर तपासणी होणे गरजेचे आहे. स्थूलता, मधुमेह, लवकर मासिक पाळी येणे, दिरंगाईची रजोनिवृत्ती आणि पीसीओएस यांमुळे गर्भशयाच्या अस्तराचा कर्करोग होतो. भारतीय महिलांमध्ये हे सर्व आजार वाढू लागले आहेत.’’

डॉ. बिंधू केएस, ऑबस्ट्रेटिक गायनॉकॉलोजी एण्ड रॉबोटिक सर्जरी विभाग, वरिष्ठ सल्लागार, अपोलो रुग्णालय, नवी मुंबई म्हणाल्या,‘‘महिलांमधील कर्करोगाचे निदान करण्यासाठी रेडिओलॉजी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. एन्ड-ओ-चेक मोहिमेच्या माध्यमातून आम्ही ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासोनोग्राफी तपासणी करतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने अंडाशय किंवा गर्भाशयाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणा-या सूक्ष्म बदलांना ओळखले जाते. या प्राथमिक टपप्यातच इमेजिंग तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डॉक्टरांना तातडीने उपचार सुरु करता येतात. परिणामी, रुग्णांसाठी उपचारांच्या सोयी पुरवता येतात. त्यांचा जीव वाचवता येतो.’’

Related posts

पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

ऑनलाईन साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणारे तीन आरोपी पश्चिम बंगाल येथून अटकेत

Leave a Comment