Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

चीनचे वऱ्हाड आले, संगमनेर येथील भोजदरीच्या दारात..!

*चीनचे वऱ्हाड आले, संगमनेर येथील भोजदरीच्या दारात..!*

संगमनेर:प्रतिनिधी;-सतीश फापाळे
एखाद्या चित्रपटात भारतीय मुलाने चीनच्या मुलीबरोबर लग्न केल्याचे पाहिले असेल, मात्र हे खऱ्या आयुष्यात संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील २९ वर्षीय राहुल हांडे घडविले. त्याने चक्क ३१ वर्षीय यान छांग या चीनी तरूणीशी चायनीज पध्दतीने लग्न करून तिला भारतात आणले. एवढेच नव्हे तर आज ते भारतीय संस्कृतीप्रमाणे सात जन्माचे फेरे देखील घेत आहेत. चीन आपले शत्रु राष्ट्र असले तरी तरूणांनी प्रेमाचे संबंध प्रस्तापित करुन
लग्नाची गाठ बांधली आहे..!

घरची परिस्थिती बेताची.. जिद्दीच्या जोरावर शिक्षण घेऊन दैनंदिन योगाचे धडे गिरवत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. योग विद्देचे शिक्षण पुर्ण करून चीनमध्ये योग केंद्र सुरू केले. या तरुणाची जिद्द व चिकाटी पाहून चिनी दांम्पत्याने त्याच्यासमोर मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तो मान्य करताच राहुल हांडे व यान यांचा विवाह सोहळा आज ३ जुलै रोजी घारगाव येथे थाटात पार पडत आहे.

संगमनेरच्या पठार भागातून भोजद- रीच्या माध्य. विद्यालयातला विद्यार्थी राहुल हांडे याने योग क्षेत्रात संधी शोधत सन- २०११ साली प्रा. डॉ. राजेंद्र वामन यांच्या
मार्गदर्शखाली संगमनेर महाविद्यालयात इ. ११ वीत प्रवेश घेतला. जिद्द व चिकाटीच्या जोरावर व दैनंदिन योगाचे धडे गिरवत पुणे विद्यापीठाच्या योग संघात राष्ट्रीय पातळीवर निवड झाली. योग निसर्गोपचार डिप्लोमा पूर्ण करीत इंग्रजी व योगाची शिक्षणातून पदवी चे शिक्षण पुर्ण केले. पदवीनंतर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ, नागपूर यांची एम. ए. योग पदवुत्तर पदवी मिळवली. योग शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रा. डॉ. राजेंद्र वामन व माजी विद्यार्थी म्हाळू शेरमाळे यांच्या मार्गदर्शनातून चीन येथे योगशिक्षक म्हणून कार्यरत झाले. स्वतःचे योग केंद्र मकाऊ, चायना देशात सुरू केले.

राहुलची कर्तबगारी पाहून चीनमधील
योंग छांग व त्यांची पत्नी मेई लियान या जोडप्याने कन्या शान हिच्यासाठी राहुल कडे विवाहाची मागणी घातली. राहुल व आई, वडील, भाऊ, बहीण सर्वांनी डॉ. वामन यांच्या मार्गदर्शनानुसार होकार दिला.

या दोघांचा लग्न समारंभ ३ जुलै रोजी घारगाव येथे पार पडत आहे. या निमित्ताने दोन्ही देशांची सांस्कृतिक देवाणघेवाण व चालीरीती, रूढी परंपरा यांचा अभ्यास होईल. समारंभास संगमनेर महाविद्यालयाचे योग विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र वामन, प्रा. डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार व योग कर्मचारी ऋषिकेश पवार आदी उपस्थित राहणार आहे. या आगळ्या विवाहाची कुतूहलाने चर्चा सुरू आहे.

*पठार भागात नदीकाठचे माणसे आजही दुष्काळामुळे मुली द्यायला तयार होत नाहीत, अशा दुष्काळी भागातील मुलाला केवळ कर्तव्य व योग क्षेत्रातील कलागुण या जोरावर आज परदेशी व्यक्तीने लग्नासाठी मागणी घालावी. ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.*

Related posts

रस्ता सुरक्षा सप्ताह2024 अंतर्गत नवी मुंबई वाहतूक विभागातर्फे नागरिकांना मार्गदर्शन

jantechasavdhanmaharashtra

*दोन वर्षे फरार आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या*

*पुणे ग्रामीणमधील अपघात रोखण्यासाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार, १५-२०% अपघात कमी करण्याचे लक्ष्य*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment