Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

नागरीकांनी डोळ्यांची तपासणी तसेच काळजी घेणे आवश्यक-डॅा.प्रतिक तांबे

नवी मुंबई प्रतिनिधी

*श्री.रामकृष्ण नेत्रालय व आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी,नवी मु्ंबई यांच्या तर्फे रविवार दि.१२/३/२३ रोजी डॅा.प्रतिक तांबे यांच्या नवजीवन क्लिनिक,से-६,कोपर खैराणे* येथे मोफत नेत्र रोग तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते त्यावेळी नागरीकांशी संवाद साधून डॅा.प्रतिक तांबे व डॅा.सौ.विजया तांबे यांनी डोळ्यांचे आजार,उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.मोबाईल,इंटरनेट चा वाढता वापर व त्यामुळे डोळ्यावर येणारा ताण,मधुमेह तसेच अनेक आजारांमुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम, मोतिबिंदू,काचबिंदू बाबत वेळेवर तपासणी करणे,विद्यार्थी तसेच तरुणांनी जास्त वेळ मोबाईल न वापरणे याबाबत समुपदेशनही केले.

यावेळी रामकृष्ण नेत्रालय मधील तज्ञ डॅाक्टरांनी शेकडो नागरीकांची मोफत डोळे तपासणी केली.

आदित्य हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सोसायटी,नवी मु्ंबई हि सामाजिक संस्था गेली सोळा वर्ष नवी मु्ंबई तसेच परिसरामधे विविध आरोग्य शिबीरे घेत असून यात महिलांचे आजार,ब्रेस्ट कॅन्सर,विविध प्रकारचे कर्करोग बाबत मार्गदर्शन,मासिक पाळी बाबत तरुणींना माहीती तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीर,जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेत असते अशी माहीती संस्थेच्या सचिव डॅा.सौ.विजया प्रतिक तांबे यांनी दिली.

Related posts

नवी मुंबईत चालत्या बसमध्ये अश्लील कृत्य करताना आढळले जोडपे; व्हिडीओ व्हायरल, कंडक्टरवर कारवाई

कोपरखैरणे मध्ये पाणी टंचाई…..नागरिक त्रस्त ; भाजपचे मा.नगसेवक व समाजसेवक आक्रमक

jantechasavdhanmaharashtra

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,

Leave a Comment