Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

म्हसवंडी गावात पडला दरोडा!! एकाच वेळी फोडली 7 घरे…*

*लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी.*

प्रतिनिधी (सतीश फापाळे)संगमनेर तालुक्याचे पठार भागातील शेवटचे टोक असलेल्या म्हसवंडी तसेच आंबी दुमाला गावात १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 ते ४ वाजेच्या सुमारास चोरांनी जणू काही गावचा सर्व्हे करत अंदाजे लाखो रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून पसार झाल्याची घटना घडली आहे.
म्हसवंडी गावातील या सात घरातील सदस्य नोकरी व्यवसाय निमित्ताने मुंबई _पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे.हे नागरिक मुंबई पुणे या ठिकाणी असताना चोरांनी याच संधीचा फायदा घेत लक्ष्मी बाबूराव बोडके,रवींद्र इथापे,बळीराम बोडके,गुलाब बोडके,अशोक बोडके,बाळासाहेब बोडके,तसेच आंबी दुमालात सुमन रंगनाथ जाधव यांची घरे फोडत शेजारील घरांनमधील लोकांना कानोकान खबर लागू न देता संपूर्ण म्हसवंडी गावातील बंद घरे ,बंगले यांचे कडी कोंडे कटरच्या साहाय्याने तोडत घरात प्रवेश केला . घरातील बंगल्यान मधील कपाटाचे लॉक तोडून कपडे साहित्य अस्ताव्यस्त केले, बेड मधील साहित्य पसरवले , तिजोरीचे कुलूप लॉक तोडले त्यातील पैसे दागिने गुंडाळले, कपाटे उचकटून फोडून कपडे,देव घरातील देव,इतर मौल्यवान वस्तू,सोने ,चांदीचे दागिन्यांसह,घरांमधील मौल्यवान वस्तू रोख रक्कमसह लाखो रुपयांचा मुद्देमाल गुंडाळून चोरांनी धूम ठोकली आहे.
संपुर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घारगाव पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने,पोलिस पांडुरंग पवार, पो.हेड कॉन्स्टेबल कैलास देशमुख ,सुभाष बोडखे,प्रमोद गाडेकर यांनी घटना स्थळाची पाहणी करत. शांताराम बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करत ठसे तज्ञ श्वानपथक रवाना केले आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक धीरज राऊत व त्यांची टीम करत आहे.

 

               मुख्य संपादक-श्री राजेंद्र बोडके

 

 

 

 

 

 

 

Related posts

कोपरखैरणे मध्ये पाणी टंचाई…..नागरिक त्रस्त ; भाजपचे मा.नगसेवक व समाजसेवक आक्रमक

jantechasavdhanmaharashtra

*म्हसवंडी गावातील दोन सुपुत्रांचा विशेष सन्मान ! – नवी मुंबई मा सभागृह नेते, रवींद्र इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत*

jantechasavdhanmaharashtra

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment