Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

नवी मुंबई (प्रतिनिधी)निसर्गाच्या या प्रकोपाने रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात संकट कोसळले आहे. घरामध्ये पाच /सहा फुटांएवढे पाणी साठून नुकसान झाले, घरांच्या भिंती कोसळल्या, शेतातील पिके, बागा यांचे नुकसान झाले. झाडे कोसळली, हजारो लोक बेघर झाले.

  • आदी पुराचा फटका बसलेल्या पूरग्रस्तांच्या या सर्व पाश्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष वंसतजी मुंढे, प्रमुख संघटक- संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे,  प्रसिध्दीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाने कोकण विभाग ठाणे शहर जिल्हा यातर्फे माणुसकी धर्म जपत एक हात मदतीचा या उपक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोकण विभाग अध्यक्ष श्री. नितिन शिंदे यांनी कोकणातील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. अध्यक्षांच्या आवाहनाला व्यापक प्रतिसाद मिळून सदस्यांनी सढळ हस्ते पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत केली असून ती गरजूंना पोहोचविण्यात आली आहे.

पूरग्रस्ताना जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू पाण्याची बाँटल, तादूंळ, गव्हाचे पिठ, साखर, अंघोळीचा/कपड्याचा साबण, टूथपेस्ट, पोहे, माचीस बाँक्स, मीठ, लहान मुलांसाठी विविध प्रकारची बिस्किट, मेणबत्ती या सर्व वस्तूंचे कीट तयार करून या वस्तू शुक्रवारी कोकण (खेड) येथे नुकसान ग्रस्त भागात देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या या एक हात मदतीच्या या उपक्रमामध्ये सढळ हस्ते मदत करणार्याचे ही कोकण विभागीय अध्यक्ष श्री. नितिन शिंदे यांनी आभार मानले आहेत

Related posts

टेंपो आणि कारची धडक. *अपघातात चार जण जखमी!. वाहनांचे मोठे नुकसान

jantechasavdhanmaharashtra

शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

*निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती, काय आहेत निकष?*

Leave a Comment