Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

पोलिस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान व्हायला पाहिजे- विवेक पानसरे ( नवी मुंबई पोलिस उपायुक्त परिमंडळ1)

 

नवी मुंबई परिमंडळ- १,विभागामध्ये पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांची नियुक्तीझाल्याबद्दल जनतेचा सावधान महाराष्ट्र चे मुख्य संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या . यावेळी बोलताना पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की,
पोलिस स्टेशनला येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचे तक्रारींचे समाधान व्हायला पाहिजे हा आमचा एक सर्वात पहिला असा मोटो असणार आहे कारण जेव्हा एखादा माणूस पीडित असतो तेव्हा तो पोलीस स्टेशनला येत असतो आणि त्या ठिकाणी त्याला सौजन्याची वागणूक मिळाली पाहिजे त्याची तक्रार ऐकून घेतली पाहिजे तक्रार एखाद्या योग्य व्यक्तीकडे चौकशी आमलदाराकडे वर्ग केली पाहिजे त्याबद्दल त्याचा मोबाईल नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तक्रार दाराला दिला गेला पाहिजे आणि त्यांच्या तक्रारींचे निरसन प्राधान्यक्रमाने व्हायला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची भूमिका आमचीअसणार आहे त्यामध्ये कायद्यायचे जे पालन करणार आहे त्यांना पोलिस आपला मित्र वाटला पाहिजे आणि जे कायदा मोडणारे आहेत त्यांना कायद्याची धाक वाटली पाहिजे अशी पोलिसांची वर्तणूक असली पाहिजे या बाबतीत आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत गेल्या दोन दिवसांपूर्वीच मी चार्ज घेतलेला आहे ज्या बाबतीत काही इशू असतील त्या बाबतीत सर्व विषयांचा अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी कसा तोडगा काढता येईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत मी सर्व जनतेला आव्हान करु इच्छितो की ज्या काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या गोष्टी जनतेने आमच्यापर्यंत मांडाव्यात आम्ही त्या गोष्टीचा नक्कीच विचार करून आणि त्याच्यावर कडक कारवाई करू

Related posts

डॉ.विश्वासराव आरोटे यांना चौथास्तंभ विकास पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार” देऊन गौरव करण्यात येणार

*घणसोली प्रभाग क्रमांक 09 जोरात आणि नाव चर्चेत आहे राजू थोरात……*

निवडणूक कितीही लांबवा …..पालिकेवर भाजपचाच झेंडा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment