माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी
अकोले,(प्रतिनिधी),– अकोले तालुक्याचे माजी आमदार व भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय मंत्री वैभवराव पिचड यांचा कोरोनाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असल्याने ते मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी रवाना झाले आहे.
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय मंत्री व तालुक्याचे माजी आमदार वैभवराव पिचड नगरपंचायत निवडणूकीत प्रचाराची धामधुमीत व्यस्त असताना गेल्या दोन दिवसांत त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांनी आज प्रथम राजुरला डॉ.बाबासाहेब गोडगे,डॉ.दिघे याचेकडे व अकोले येथील डॉ.मारुती भांडकुळी याचेकडे तपासणी केली यावेळी त्यांचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने प्राथमिक उपचार घेऊन त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे यावेळी मध्यमातील प्रतिनिधीशी संवाद साधताना पिचड म्हणाले कि नगरपंचायत निवडणुकीत सातत्याने मतदारांशी संपर्क साधत असताना माझ्याकडुन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक होते त्यात त्रुटी राहिल्याने आज माझा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.प्राथमिक उपचारानंतर डॅाक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी मी मुंबई ला जात आहे.तरी माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी .
तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या मध्ये परत येऊन पुन्हा तालुक्याच्या प्रश्नात लक्ष्य घालेल .तसेच कोरोना व ओमायक्रोन संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रत्येकानी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी .नगरपंचायत निवडणुकीत मला जनतेने दिलेला प्रतिसाद पाहता पुढील चार प्रंभागातील मतदारांनी भाजप मित्र पक्षाच्या उमेदवारांना मदत करून आपले आशीर्वाद द्यावेत ही विनंती केली आहे.

