Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,अनेक तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने आयोजन आयोजक–श्री योगेश महाजन

नवी मुंबई (प्रतिनिधी):- कोरोना काळात रोजगाराची झालेली पडझड व अनेकांची तळमळ पाहता राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने १५ जानेवारी २०२२ रोजी सानपाडा या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी बहुतांश कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याने तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी उपल्बध असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष योगेश महाजन यांनी सांगितले.कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा मेळावा सानपाडा रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्स, D – १०४, सानपाडा,नवी मुंबई या ठिकाणी पार पाडण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात तरुण तरुणींना रोजगार असल्याचे आव्हान करण्यात आले असता शेकडो जणांनी कामासाठी संघटनेच्या सानपाडा कार्यालयात हजेरी लावली.त्याचवेळी अनेक जण मंडळाच्या नियमात बसत नसल्याचे दिसून आले तर काही जणांना मंडळाव्यतिरिक्त दुसरीकडे नोकरी हवी असल्याचे निदर्शनास आले.राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या बेरोजगारानां राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने रोजगार देता यावा यासाठी राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात d mart, Icici bank ,Hdfc bank, Axis Bank ,HDB finance, Kissht financ ,L&t finance, Ebicash, Megus , Cash management services, Krystal security, Ola mart , Eureka Forbes , Assuredge, Athena bpo, RBL bank या कंपन्या सहभागी असून इतरही कंपन्या सहभागी होणार आहेत.या सर्व कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असल्याने तरुणांना नक्कीच काम मिळेल अशी अपेक्षा योगेश महाजन यांनी व्यक्त करत कामासाठी 8689861548 / 9321804481 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.

Related posts

*पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठाप्रथम प्राधान्य देण्यात यावे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक*

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट पर्यंत आरोग्य शिबीर

म्हसवंडी गावात पडला दरोडा!! एकाच वेळी फोडली 7 घरे…*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment