Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल *”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त “घरो घरी तिरंगा“*

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

*’घरो घरी तिरंगा’ अभियनात सर्वांनी सहभागी व्हावे- आरोटे

दिल्ली (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतिने प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, राज्यसंघटक संजयजी भोकरे, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा” निमित्त भारत सरकारच्या संकल्पनेतुन “घरो घरी तिरंगा” या उत्सवा निमित्त आज दिल्ली येथे महाराष्ट्र भवन अधिकारी पोलिस व कामगार वर्गास तिरंगा झेंडा देऊन गौरव करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे .गोव्याचे जेष्ठ पत्रकार प्रभाकर ढगे राजश्री चौधरी रघुनाथ सोनवणे.कमलाकर पाटील नामवंत उद्योजक सागर भैय्या दौलतोडे जेष्ठ पत्रकार संजय फुलसुंदर यासह आदी उपस्थित होते
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरो घरी तिरंगा’ मोहीम राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच उद्देशाने काल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर भैय्या दौलतोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय फुलसुंदर यांनी मानले
तर दिल्ली येथील महाराष्ट्र येथिल रहीवासी नागरीकांना यावेळी वितरण करण्यात आले तर उपक्रमास यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related posts

वडज गावामध्ये नवजवान गणेशोस्तव मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

jantechasavdhanmaharashtra

पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ ..! लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Comment