Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

NMMS परीक्षेमध्ये नवीमुंबई महानगर पालिकेच्या शाळा क्र 42 घणसोली मधील  तब्बल ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…!!*

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

NMMS परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेच्या  तब्बल ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत…!!*

नवी मुंबई (प्रतिनिधी)जून २०२२* मध्ये पार पडलेल्या NMMS परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका *शाळा क्र. ४२, घणसोली* शाळेतील उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांपैकी *तब्बल ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.* ठाणे जिल्ह्याच्या सामान्य गुणवत्ता यादीमध्येही *(GEN)* शाळेतील एक विद्यार्थिनी पहिल्या पाच मध्ये झळकली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती परिक्षेसोबतच NMMS परीक्षेची तयारीही चालू होती. शिष्यवृत्ती परीक्षेपाठोपाठ NMMS परीक्षेतही शाळेने *यशाची चढती कमान* राखली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे तत्कालीन उपायुक्त (शिक्षण) श्री. जयदीप पवार  तसेच व विद्यमान उपायुक्त (शिक्षण) श्री. योगेश कडुस्कर  हे स्वतः स्पर्धा परीक्षांच्या व विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांच्या सूचनेनुसार विस्तार अधिकारी सौ. सुलभा बारघरे  यांच्या माध्यमातून शिक्षण विभागाकडूनही मार्गदर्शक पुस्तके वेळेत मिळाली. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांची चिकाटी या साऱ्याचा एकत्रित परिपाक म्हणजे आजचे हे यश. सर्व यशस्वी विद्यार्थी व पूर्वतयारीसाठी विशेष मेहनत घेणारे इ. ८ वीचे वर्गशिक्षक श्री. ज्ञानेश्वर जाधव सर, सौ.शोभा बुक्कानुरे मॅडम, श्री. नितीन भरसट सर, श्री. सागर साळवे सर ,सौ. प्रियंका लकडे मॅडम, सौ. प्रीती पाटील मॅडम व सौ. अपर्णा भागवत मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मन:पूर्वक अभिनंदन. केले….!!
विस्तार अधिकारी शिक्षण विभाग तथा तत्कालीन मुख्याध्यापक श्री. खुशाल य. चौधरी सर, प्रभारी मुख्याध्यापक श्री. संजय मोरे सर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. शिष्यवृत्ती परीक्षेसोबतच *NMMS साठीही स्वतंत्रपणे दोन सराव परीक्षांचे आयोजन* करण्यात आले होते. सराव परीक्षेचे केंद्रसंचालक श्री. संतोष मुंढे सर व श्री. देवराम टोपले सर, परीक्षेची तांत्रिक व संगणकीय बाजू सांभाळणारे श्री. बबन दरेकर सर व सराव परीक्षेची टीम यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या दैदीप्यमान यशाच्या पार्श्वभूमीवर *साऱ्यांचेच मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त करण्यात आले….!!*

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

Related posts

*वाशी वाहतूक शाखेची २०२५ मध्ये कडक कारवाई; ६८ हजारांहून अधिक केसेस, कोट्यवधींचा दंड वसूल*

म रा मराठी पत्रकार संघ नविमुंबई अध्यक्ष दशरथ चव्हाण यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

झेप्टो कंपनीचे टू व्हीलर चालक अवैद्यरीत्या पार्किंग करत असल्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेची कारवाई

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment