Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षात  युती होण्याची शक्यता

*शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षात  युती होण्याची शक्यता*

मुंबई |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यांनतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाला. मात्र अशातच राज्यात एक महत्त्वाचं समीकरण उदयाला आलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचं जाहीर केलंय.

मुंबईत आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडच्या प्रमुख प्रवक्त्याने म्हटले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी या नव्या युतीचे स्वागत केलं आहे. शिवप्रेमी असल्याने आपलं रक्त एकच आहे. सध्या आमच्याकडे काही नसताना सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असंही ठाकरे म्हणाले.

Related posts

मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद..आंदोलने मागे घेण्याचे देखील कळकळीचे आवाहन..

तर महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती*

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई परिवहन कार्यालयाचे चाचणी केंद्र नेरूळ येथे उपलब्ध करण्यात यावे ! निलेश कचरे

Leave a Comment