(जेष्ठ पत्रकार)
सुनील गायकवाड
नवी मुंबईतून तडीपार असलेल्या गुन्हेगारानेच नवी मुंबईतून मोटरसायकल केल्या लंपास
मोटर सायकल चोरट्यास अटक !
रबाळे पोलिसांची यशस्वी कामगिरी !
नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वाशी पोलीस स्टेशनच्या प्रस्तावानुसार तडीपार असलेल्या गुन्हेगारानेच नवी मुंबई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोटरसायकल चोरण्याचा धुमाकाळ घातला होता या चोरट्याने विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एकूण 46 मोटरसायकल चोरल्याचे पोलीस तपासा दरम्यान कबुली दिलेली आहे
या चोरट्याचे नाव नासिर खान वय वर्ष (58) राहणार पार्कसाईट विक्रोळी असे असून तो,मोटरसायकल गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करत आहे.
रबाळे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विविध प्रकारच्या मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना घडत असल्याच्या तक्रारी रबाळे पोलीस स्टेशन मध्ये प्राप्त होत असत या घटनेचा बीमोड करण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त संजय मोहिते, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्तडी डी टिळे, यांच्या सूचनेनुसा रबाळे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी डी ढाकणे, यांनी या आरोपीच्या मुस्क्या आवळण्यासाठी विशेष पथक गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक ,बी एन ,औटी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केले.या पथकाने ,चोरट्या आरोपीची शोध मोहीम,सुरू केल्यानंतर २३ ,जानेवारी २०२३ रोजी ऐरोली रेल्वे परिसरात हातामध्ये मध्ये पिशवी असलेल्या ,एक इसम,संशयास्पद हालचाली ,करत असल्याचे ,पोलीस पथकाच्या ,निदर्शनास आले
,पोलिसांनी या ,संशयित आरोपीला ताब्यात घेतले असता पोलीस ,खाक्या दाखवताच ,आरोपींनी मोटर सायकल चोरी करत असल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीकडून मोटार सायकल चोरी दरम्यान वापरत असलेले विविध अवजारे देखील ,रबाळे पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत
आरोपीला ,न्यायलात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 1 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पत्रकार परिषदे मध्ये उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिलेली आहे
दरम्यान: हा आरोपी बनावट चावीच्या द्वारे मोटर सायकल चोरी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे
आरोपी हा मोटर सायकल मेकॅनिकल असल्या कारणाने त्याला कोणतीही मोटरसायकल सहजरित्या चालू करण्यास अडचण येत ,नसल्याने चपलाईने गाडीचे विविध पार्ट इतरत्र विकण्यात पटाईत होता अशा आरोपीला शितफिने रबाळे पोलिसांनी ताब्यात घेऊन ,त्याच्या मुस्क्या आवळण्यात यश प्राप्त केलेले आहे.
आरोपी कडून,एकूण ९ लाख २०,हजार,२०० रुपये, किमतीचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आलेला आहे.या कामी अधिक तपास ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात करत आहेत.
रबाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
डी डी ढाकणे
पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, यांचे नवी मुंबईतील नागरिकांना जाहीर आव्हान*
नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या पार्किंग मध्ये ,पार्क करावी,वाहन चोरी प्रतिबंधक होण्यासाठी,हँडल लॉक सायरन जी पी एस यंत्रणायाचा वापर करावा
सोसायटी सभासद यांनी कमिटी सदस्य यांच्याशी समन्वय ,साधून सोसायटी आवारात पार्किंग बाबतयोग्य नियोजन करून पार्किंगची व्यवस्था ,करावी परंतु आवाराच्या बाहेरील बाजूस उघड्यावर पार्किंग करण्याचे टाळावे

