Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वाशी वाहतुक पोलिसांकडून अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी कारवाई


*वाशी वाहतुक पोलिसांकडून अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी कारवाई*

नवी मुंबई(प्रतिनिधी) नवी मुंबई वाशी शहरातुन जाणारा सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे. सदरचा महामार्ग मुंबई व नवी मुंबई या दोन महत्वाच्या शहरांना जोडणारा महामार्ग आहे. सदर महामार्गावर वाशी येथे टोल नाका व खाडीवर पुल आहे. वाशी खाडी पुल हे अपघात प्रवण क्षेत्र आहे.

सदर ठिकाणी वारंवार होणारी वाहतुक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाशी वाहतुक शाखेकडील जास्तीत जास्त मनुष्यबळाचा वापर करण्यात येवुन खाडी पुलावर टोविंग वाहनासह गस्त करण्यात येते. गर्दीच्या वेळी वाहतुक परिस्थितीनुसार टोल नाका येथे लेन वाढवुन डायवर्शन करण्यात येते. तसेच जड अवजड वाहनांचे चालकांना डावीकडुन वाहने चालविण्याबाबत प्रबोधन करण्यात येते. त्याचे ठिकठिकाणी फलक देखील बसवुन घेण्यात आलेले आहेत.

 

तसेच वाशी वाहतुक शाखेच्या कार्यक्षेत्रात मोटर वाहन कायद्याचा भंग करणा-या वाहनचालकांवर दैनंदिन कारवाई करण्यात येते. वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी दररोज वेगवेगळया ठिकाणी विशेष कारवाईचे आयोजन करण्यात येते. सदर कारवाई दरम्यान वाहन चालकांचे वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत प्रबोधन करण्यात येते. दिनांक ०७/०२/०२३ रोजी वाशी वाहतुक शाखेच्या कार्यक्षेत्रात हेल्मेट परिधान न करणा-या वाहन चालक व पिलीयन रायडर यांचेविरुध्द् विशेष मोहीम राबवुन एकुण १४५ जणांवर केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच दिनांक ०८/०२/२०२३ रोजी सिट बेल्ट न लावणा-या वाहन चालकांविरुध्द् विशेष मोहीम राबवुन एकुण ३४ केसेस करण्यात आलेल्या आहेत.

सन २०२२ मध्ये वाशी वाहतुक शाखेकडुन वाहतुकीचे नियम भंग करणा-या एकुण ६५८३७ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन एकुण १००५९५५०/- (अक्षरी एक कोटी एकोणसाठ हजार पाचशे पन्नास ) रुपये तडजोड रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२३ मध्ये आजपावेतो एकुण ५१२३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली असुन त्यांचेकडुन ३१६३५०/- रुपये तडजोड रक्कम वसुल करण्यात आलेली आहे. सन २०२२ मध्ये सिग्नल तोडणा-या, धोकादायकरित्या वाहन चालविणा-या, वाहन चालवितांना मोबाईल फोनचा वापर करण्या-या तसेच मोटर वाहन काद्यातील इतर नियमांचा भंग करणा-या वाहन चालकांचे एकुण ६३४ लायसन्स् उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी, नवी मुंबई यांना प्रस्ताव सादर करुन निलंबित करण्यात आलेले आहेत.

मा. श्री. मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. तिरुपती काकडे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक, नवी मुंबई व मा. श्री. राहुल गायकवाड, सहा. पोलीस आयुक्त. वाहतुक, , नवी मुंबई यांचे निर्देशानुसार श्री. बापुराव देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी वाहतुक शाखा व स्टाफ यांनी वरीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.

वाहतुक कोंडी व अपघात टाळण्याच्या उद्देशाने सर्व वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळुन सहकार्य करण्याबाबत वाशी वाहतुक शाखेचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक,श्री. बापुराव देशमुख, यांच्या मार्गदर्शना खाली आवाहन करण्यात आले

स्थानिक नागरिकांनी या कार्याचे वाशी वाहतूक शाखा पोलिसांचे कौतुक केले

Related posts

राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत 19 हजार 460 पदांची मेगा भरती; 5 ऑगस्ट पासून चालू

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनची ठाण्यात मोठी कार्यवाही

jantechasavdhanmaharashtra

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment